शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
2
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
3
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
4
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
5
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
6
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
7
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
8
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
11
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
12
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
13
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
14
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
15
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
16
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
17
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
18
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
19
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!

कर्जमाफीनंतरही आत्महत्या थांबलेल्या नाहीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:53 IST

सरकारने शेतकºयांना वीज, पाणी, ठिबक सिंचन, बियाणेही उपलब्ध करून देणे गरजेचे आहे व त्यादृष्टीने प्रयत्नदेखील केले जात आहे. यापूर्वीच्या व भाजपा सरकारने कर्जमाफ ी देऊनही शेतकºयांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत, अशी खंत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने ‘कार्यक्षम आमदार’ पुरस्कार सोहळ्याच्या प्रारंभी प्रकट मुलाखतीमध्ये त्यांनी दिलखुलास उत्तरे देत भाष्य केले.

नाशिक : सरकारने शेतकºयांना वीज, पाणी, ठिबक सिंचन, बियाणेही उपलब्ध करून देणे गरजेचे आहे व त्यादृष्टीने प्रयत्नदेखील केले जात आहे. यापूर्वीच्या व भाजपा सरकारने कर्जमाफ ी देऊनही शेतकºयांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत, अशी खंत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने ‘कार्यक्षम आमदार’ पुरस्कार सोहळ्याच्या प्रारंभी प्रकट मुलाखतीमध्ये त्यांनी दिलखुलास उत्तरे देत भाष्य केले.  राज्यातील शेतकºयांच्या आत्महत्या या नैराश्यापोटी होत असून, निसर्गाचा लहरीपणा या नैराश्याला कारणीभूत जरी असला तरी तेच एकमेव कारण यामागील असू शकत नाही. भाजपा सरकारने ३२ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली. तसेच यापूर्वीच्या सरकारने साडेपाच हजार कोटींची कर्जमाफी दिली होती. तरी राज्यात शेतकºयांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत, हे मोठे दुर्दैव आहे. दरम्यान, महाजन यांनी स्वत:चा प्रवासही उलगडून दाखविला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जामनेरसारख्या गावाचा सरपंच होत पुढे सलग पाच वेळा विधानसभेसाठी जनतेनी मला निवडून दिले. जात, धर्म, पंथ या गोष्टींकडे मी कधीही लक्ष दिले नाही आणि त्याची मला गरज वाटली नाही व भविष्यातही वाटणार नाही. लोकाभिमुख कार्यासाठी मी वाहून घेतले व त्यासाठी मी पुढे असतो किंबहुना तो माझा मूळ स्वभावच आहे, असेही महाजन यांनी यावेळी नमूद केले. लोकांच्या आरोग्याची सेवा केली, राज्यात लाखो लोकांसाठी वैद्यकीय महाशिबिरे घेतली. नाशिकचा कुंभमेळा यशस्वीतेसाठी राज्य व केंद्र सरकारकडून भरघोस निधी मिळविला व कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, असे महाजन यावेळी म्हणाले. मुखत्यारसिंह पाटील व पत्रकार श्रीमंत माने यांनी महाजन यांची प्रकट मुलाखत घेतली.विवाहसमारंभ-आजारपणावर मोठा खर्चआजारपण व लग्नसोहळ्यांचा शेतकºयांना फटका बसत असून, विवाहाचा थाटबाट सांभाळताना शेतकºयाला प्रत्येकी पंधरा लाखांचा खर्च येतो, असे निरीक्षण महाजन यांनी यावेळी बोलताना नोंदविले. विवाहावरील खर्च कमी कसा करता येऊ शकेल त्यादृष्टीने विचार करण्याची गरज असल्याचे महाजन म्हणाले.व्यायामामुळेच सुदृढआपण शाकाहारी असून, मद्यपान-धूम्रपानासह चहाच्या चवीपासूनही मी कोसो दूर आहे. दररोज व्यायाम केला नाही तर आजारी असल्यासारखे वाटते. व्यायामाची सवय व निर्व्यसनी असल्यामुळे मी सुदृढ राहिलो, असेही गुपित महाजन यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनfarmer suicideशेतकरी आत्महत्या