पुणे येथील व्यापाऱ्याची नाशकात आत्महत्त्या

By Admin | Updated: September 4, 2014 00:03 IST2014-09-04T00:02:39+5:302014-09-04T00:03:40+5:30

पुणे येथील व्यापाऱ्याची नाशकात आत्महत्त्या

Suicide in a Nashik Nashik commercial corporation | पुणे येथील व्यापाऱ्याची नाशकात आत्महत्त्या

पुणे येथील व्यापाऱ्याची नाशकात आत्महत्त्या


नाशिक : पुणे जिल्ह्णातील धनकवडी येथील व्यापारी संतोष पुंडलीक देशमाने (३३) याने बुधवारी दुपारी राजदूत हॉटेलमध्ये गळफ ास घेऊन आत्महत्त्या केली़ सोमवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास देशमाने याने ठक्कर बाजारसमोरील हॉटेल राजदूत हॉटेलमधील १०३ क्रमांकाचा खोली घेतली होता़ बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्याने आपल्या रूममध्ये गळफ ास घेऊन आत्महत्त्या केली़ हॉटेल चालकाच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने सरकारवाडा पोलिसांना घटनेची माहिती दिली़ यानंतर पोलिसांना घटनास्थळी पोहोचून पंचनामा करीत मयत संतोष देशमानेचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला़ संतोष देशमानेची पुणे पोलिसांत बेपत्ता असल्याची नोंद असून या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
दरम्यान त्याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून मित्रांना कर्जाऊ दिलेले १३ लाख रुपये परत मिळाले नसल्याचा त्यामध्ये उल्लेख आहे़ पैसे परत मिळत नसल्यानेच देशमानेने आत्महत्त्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे़(प्रतिनिधी)

Web Title: Suicide in a Nashik Nashik commercial corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.