कर्जाला कंटाळून शेतकºयाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:10 IST2017-12-29T00:07:37+5:302017-12-29T00:10:45+5:30
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील तुकाराम देवराम अलगट (४५) या शेतकºयाने कर्जाला कंटाळून राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली.

कर्जाला कंटाळून शेतकºयाची आत्महत्या
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील तुकाराम देवराम अलगट (४५) या शेतकºयाने कर्जाला कंटाळून राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली.
तुकाराम अलगट हे अल्पभूधारक शेतकरी असून पाच ते सात वर्षापासून कर्जामुळे हैराण झाला होते. दरवर्षी शेतीच्या उत्पादनात घट होत असल्याने मुलाचे शिक्षण, घर संसार या अडचणींमुळे तुकाराम अलगट चिंतेत असायचे. त्यांच्यावर बॅँक आॅफ महाराष्ट्रचे एक लाख कर्ज व राजापूर विकास सोसायटीचे ५४ हजारांचे कर्ज होते. या कर्जाची परतफेड वेळेवर होत नसल्याने त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन बुधवारी रात्री आत्महत्या केली. या घटनेची येवला तालुका पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन करण्यात येवून शव नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. पूढील तपास सपोनि देविदास पाटील करित आहे.