मुंजवाड येथील शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:19 IST2021-08-28T04:19:25+5:302021-08-28T04:19:25+5:30

शरद बागुल हे दोन दिवसांपासून बेपत्ता होते. गुरुवारी (दि.२६) सकाळी त्यांचा मृतदेह मोरेनगर शिवारातील आरम नदीकाठच्या विहिरीत तरंगत असल्याचे ...

Suicide of a farmer in Munjwad | मुंजवाड येथील शेतकऱ्याची आत्महत्या

मुंजवाड येथील शेतकऱ्याची आत्महत्या

शरद बागुल हे दोन दिवसांपासून बेपत्ता होते. गुरुवारी (दि.२६) सकाळी त्यांचा मृतदेह मोरेनगर शिवारातील आरम नदीकाठच्या विहिरीत तरंगत असल्याचे आढळून आले. शेतकरी नानाजी सोनवणे यांनी तत्काळ सटाणा पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी शोध घेऊन मृतदेह शरद बागुल यांचा असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

-----------------------------------------------------

अपघातात एक ठार

सटाणा : मोरेनगर येथील दत्ता केशव जोशी (४८) हे मोटारसायकलने डांगसौंदाणेमार्गे सुळे पिंपळे येथे आपल्या नातेवाइकांकडे जात असताना गणोरेनजीक अचानक मोटारसायकल स्लिप झाल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Suicide of a farmer in Munjwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.