देवळाली कॅम्प येथे दोघांची आत्महत्त्या

By Admin | Updated: July 5, 2014 00:16 IST2014-07-04T23:50:08+5:302014-07-05T00:16:34+5:30

देवळाली कॅम्प येथे दोघांची आत्महत्त्या

Suicide in Devlali Camp | देवळाली कॅम्प येथे दोघांची आत्महत्त्या

देवळाली कॅम्प येथे दोघांची आत्महत्त्या

देवळाली कॅम्प : महिन्यापूर्वी लग्न झालेल्या युवकाने महाविद्यालयीन युवतीसह लहवित रेल्वे स्टेशनजवळ धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्त्या केल्याची घटना घडली.
येथील लष्कराच्या डेअरी फार्म वसाहतीत राहणाऱ्या संतोष सोनू कुंदे (२५) व कल्पना ऊर्फ मिनू वसंत सहाणे (१८) या दोघांनी गुरुवारी (दि. ३) रात्री ११.३० च्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाडीखाली लहवित येथील रेल्वे रुळावर स्वत:ला झोकून देत आत्महत्त्या केली.
या प्रकरणी लहवित रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर रामजी बिद यांनी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनला खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रेल्वे पोलिसांच्या साथीने पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नाशिक येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
दरम्यान, युवतीचे वडील वसंत रामकिसन सहाणे यांनी गेल्या गुरुवारीच मुलगी कल्पना बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदविली होती. सकाळी महाविद्यालयात जाते असे सांगून गेलेली मुलगी रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने वडिलांनी रात्री ९.३० वाजता तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दोन तासांनीच युवक व युवतीने लहवित येथे आत्महत्त्या केल्याची घटना उघडकीस आली.
या प्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बैरागी करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Suicide in Devlali Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.