सदस्यांना सन्मान देण्याच्या सूचना
By Admin | Updated: May 17, 2017 00:20 IST2017-05-17T00:20:22+5:302017-05-17T00:20:45+5:30
सदस्यांना सन्मान देण्याच्या सूचना

सदस्यांना सन्मान देण्याच्या सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : आल्या आल्याच वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैलीमुळे प्रकाशझोतात आलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी महिला सदस्याच्या पतीराजांना यापुढे येताना ‘सोबत सदस्यांनाही आणा’ अशा सूचना केल्याने जिल्हा परिषदेत तो एक चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थेत लोकप्रतिनिधींबरोबर कामकाज करण्याची पहिलीच वेळ असल्याने जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांचा मान-सन्मान राखा, अशा सूचना अध्यक्ष शीतल सांगळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांच्या अनौपचारिक बैठकीत दिल्याचे समजते.मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच वेगळ्या कामकाजाचा ठसा उमटविण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र आहे. काही महिला जिल्हा परिषद सदस्यांचे पतीराज मीना यांना भेटण्यासाठी गेले असता, त्यांनी ‘यापुढे येताना जिल्हा परिषद सदस्यांना (सौभाग्यवतींना) सोबत आणा’ असे गमतीने सांगितले होते़