जिल्हा रुग्णालयात आॅक्सिजन सेंटर निर्मितीच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 12:01 AM2020-09-18T00:01:06+5:302020-09-18T01:26:15+5:30

नाशिक: जिल्'ात आॅक्सिजन पुरेसा आहे; प्रत्येक रूग्णाला तो वेळेत मिळेल यासाठीचे नियोजन करण्यात यावे. जिल्हा रुग्णालयात आॅक्सिजन निर्मिती सेन्टर सुरू करण्यात यावे, तसेच आॅक्सिजनची वाहतुक करणाऱ्या वाहनांची कुठल्याही ठिकाणी अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याबरोबरच वैद्यकीय उपचारासाठीच आॅक्सिजन वाहतुक व पुरवठ्यासाठी दोन टँकर उपलब्ध करून देण्यात येणार असून त्याचे व्यवस्थापन करण्याच्या सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा जिल्'ाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

Suggestions for creation of Oxygen Center in District Hospital | जिल्हा रुग्णालयात आॅक्सिजन सेंटर निर्मितीच्या सूचना

जिल्हा रुग्णालयात आॅक्सिजन सेंटर निर्मितीच्या सूचना

Next
ठळक मुद्देभुजबळ यांच्याकडून आढावा: वाहतुकीसाठी दोन टँकर

नाशिक: जिल्'ात आॅक्सिजन पुरेसा आहे; प्रत्येक रूग्णाला तो वेळेत मिळेल यासाठीचे नियोजन करण्यात यावे. जिल्हा रुग्णालयात आॅक्सिजन निर्मिती सेन्टर सुरू करण्यात यावे, तसेच आॅक्सिजनची वाहतुक करणाऱ्या वाहनांची कुठल्याही ठिकाणी अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याबरोबरच वैद्यकीय उपचारासाठीच आॅक्सिजन वाहतुक व पुरवठ्यासाठी दोन टँकर उपलब्ध करून देण्यात येणार असून त्याचे व्यवस्थापन करण्याच्या सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा जिल्'ाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जिल्'ातील कोरोना उपचारासंबंधी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, पुरेसे मनुष्यबळ, वैद्यकीय अधिकारी, आॅक्सिजन, व्हेंटीलेटर्स, बेड उपलब्ध असूनही नागरीकांपर्यंत त्याची माहिती पोहचविण्याची प्रणाली गरजेप्रमाणे निर्माण करून त्यात आवश्यकतेनुसार सुधारणा तसेच त्याचे वेळोवेळी मुल्यमापन केले नाही तर लोकांमध्ये असुरक्षितता व भितीचे वातावरण निर्माण होते. वैद्यकीय सुविधा व त्याची आवश्यकता यावरील किती व कशी ? यासाठी लोकांमध्ये जनजागृतीही करण्याची गरज आहे. आॅक्सिजनच्या तुटवड्याबाबत वारंवार प्रसारमाध्यमांमधून चर्चा होत आहे परंतु जिल्'ात सध्या प्रत्येक रूग्णासाठी ७ ते ८ लिटर पर मीटर इतका आॅक्सिजन गरजेचा आहे. आज जिल्'ात जवळ जवळ एक हजार रुग्णांसाठी २४ ते २५ मे. टन आॅक्सिजन लागत असून आपल्याकडे तो ४३ मे.टन इतका उपलब्ध आहे. यातील आॅक्सिजनचा पुरवठा प्रामुख्याने वैद्यकीय प्रयोजनासाठी वापरण्यात यावा व वैद्यकीय कारणासाठी पुरेसा उपलब्ध आहे, याची खात्री झाल्यानंतरच अन्न व औषध प्रशासनाच्या व उद्योग केंद्रांच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली उद्योगासाठी त्याचे व्यवस्थापन करावयाचे आहे. दैनंदिन आॅक्सिजन वाहतुकीसाठी टँकर्सची आवश्यकता असून त्यासाठी तात्काळ आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी दररोज आॅक्सिजनच्या वाहतुकीसाठी २ टँकर्स पुरवण्याची ग्वाही दिली आहे. कोरोना हा निरंतर चालणारा आजार असून त्यावर शाश्वत उपाययोजना म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात आॅक्सिजन सेंटर्सची निर्मिती करणे गरजेचे आहे. ते करण्यासाठी तात्काळ ई-निविदेच्या माध्यमातून तात्काळ काम सुरू करावे, कुठल्याही पेशंटला आॅक्सिजनची कमतरता सद्यस्थितीत भासणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी तसेच आॅक्सिजन बेड व व्हेंटीलेटर्सची संख्याही येणाºया काळात मोठ्या प्रमाणावर उपलब्धता वाढविण्यासाठी नियोजन करावे. कोरोनाग्रस्तांना दुप्पट आॅक्सिजन भासेल या अंदाजाने भविष्याचे नियोजन करावे, अशा सूचना यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी केल्या आहेत.
बैठकीच्या सुरूवातीला जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी जिल्'ातील एकूण कोरोना स्थितीबाबतची माहिती विषद केली. पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आपापल्या कर्यक्षेत्रातील माहिती सादर केली.

 

Web Title: Suggestions for creation of Oxygen Center in District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.