गंगापूर धरणालगत सायकल ट्रॅक विकसित करण्याची सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:38 IST2020-12-04T04:38:41+5:302020-12-04T04:38:41+5:30
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा परिसर नयनरम्य आहे. धरणाच्या बॅक वॉटरला पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून बोट क्लब आणि पर्यटन ...

गंगापूर धरणालगत सायकल ट्रॅक विकसित करण्याची सूचना
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा परिसर नयनरम्य आहे. धरणाच्या बॅक वॉटरला पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून बोट क्लब आणि पर्यटन केंद्र विकसित झाले आहे. आता याठिकाणी सायकल ट्रॅकचादेखील विकास करता येणे शक्य आहे. हे धरण बांधताना जलसंपदा विभागाने ज्यादा पूर क्षमतेचा विकास करून अतिरिक्त जागा ताब्यात घेतली आहे. या बॅक वॉटरलगत गिरणारे, नागलवाडी, पिंपळगाव गरुडेश्वर, ओझरखेड, गणेश गाव, गंगावऱ्हे, सावरगाव अशी गावे आहेत. त्यामुळे शंभर मीटरचा हा रस्ता असून त्याठिकाणी शंभर मीटर जागा किमान ताब्यात आहे. त्यामुळे इटली, स्पेन, इंग्लंड, स्वित्झर्लंड, जर्मनी या देशांच्या धर्तीवर सायकल ट्रॅक उभारता येईल, असे जाधव यांनी म्हटले आहे.