दिंडोरी तालुक्यात यंदा उसाची गोडी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 08:59 PM2020-09-07T20:59:28+5:302020-09-08T01:13:27+5:30

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील शेतकरीवर्गाने यंदाच्या हंगामात ऊस लागवड क्षेत्रात आघाडी घेतल्याने उसाची गोडी यंदा वाढणार आहे. हमीभाव मिळाल्यास कष्टाला फळ मिळणार असल्याची भावना ऊस उत्पादकांनी व्यक्त केली आहे.

Sugarcane will be grown in Dindori taluka this year | दिंडोरी तालुक्यात यंदा उसाची गोडी वाढणार

दिंडोरी तालुक्यात यंदा उसाची गोडी वाढणार

googlenewsNext
ठळक मुद्देलागवड क्षेत्रात वाढ : कोरोनाच्या विघ्नातून मार्ग; हमीभाव मिळण्याची उत्पादकांना अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील शेतकरीवर्गाने यंदाच्या हंगामात ऊस लागवड क्षेत्रात आघाडी घेतल्याने उसाची गोडी यंदा वाढणार आहे. हमीभाव मिळाल्यास कष्टाला फळ मिळणार असल्याची भावना ऊस उत्पादकांनी व्यक्त केली आहे.
दिंडोरी तालुक्यातील शेतकरी मागील हंगामात कोरोनामुळे त्रस्त झाला होता. त्यामुळे रब्बी हंगामाचा खडतर प्रवास करून बळीराजाने खरीप हंगामासाठी तयारी केली. उन्हाळ्यात उसाला रसवंतीसाठी मोठी मागणी असते. परंतु कोरोनामुळे लॉकडाऊनची स्थिती असल्यामुळे तालुक्यातील सर्वच रसवंतीगृह बंद पडल्यामुळे तयार झालेल्या उसाला जनावरांचा चारा म्हणून वापर करण्यात आला. तसेच लखमापूरमध्ये तीन गुºहाळे म्हणजे गूळ बनविणारे कारखाने आहेत. ते ऊसतोड मजुरांमुळे बंद स्थितीत होते. त्यामुळे बराच ऊस
जनावरांच्या चारा रूपाने कवडीमोल भावाने शेतकरीवर्गाला विकावा लागला. परंतु शेतकरीवर्गाने या
गोष्टीकडे कानाडोळा करत आपल्या शेतामध्ये या हंगामात पुन्हा ऊस लागवडीला पसंती दिली.
कृषी विभागाच्या माहितीच्या आधारे अंदाजे २७०० हेक्टर उसाची तालुक्यात झाल्याचे समजते.
तालुक्यातील उसाची लागवड कादवा सहकारी साखर कारखान्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची मानली जाणार आहे.‘कादवा’कडून ऊस उत्पादकांना आधारआर्थिक कोंडीत सापडलेल्या बळीराजाला मोठा आधार देऊन २०१९-२०२०च्या गळीत हंगामात गाळप केलेल्या उसाची संपूर्ण एफआरपी आतापर्यंत अदा केलेली आहे तसेच शेतकरीवर्गाने ऊस लागवड मोठ्या प्रमाणात करण्यासाठी तसेच आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकरीवर्गासाठी उधारीने खतांची विक्र ी तसेच बुकिंग करून ऊस पिकांचे विविध प्रकारचे बेणे उपलब्ध करून देऊन मोठा आधार दिला आहे. मागील हंगामात कादवाची एफआरपी २७३६.३७ असून, रक्कम ऊस उत्पादकांच्या खाती वर्ग केली आहे.जिल्ह्यातील निसाका, रासाका, नाशिक सहकारी साखर कारखाना ऊसटंचाई, पाणीटंचाई, ऊसतोड मजुरांची टंचाई, नियोजन आदी गोष्टींमुळे बंद स्थितीत आहे. परंतु कादवा सहकारी साखर कारखाना प्रत्येक हंगामात चालू आहे. शेतकरीवर्गाने आपल्या शेतामध्ये केलेली उसाची लागवड. यामुळे आम्ही प्रत्येक हंगामात यशस्वी होत आहे.
- विश्वनाथ देशमुख, संचालक, कादवा सहकारी साखर कारखाना, लखमापूर गट

Web Title: Sugarcane will be grown in Dindori taluka this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.