कादवा कारखान्यातर्फे उसाचे पेमेंट वर्ग
By Admin | Updated: December 12, 2015 22:53 IST2015-12-12T22:51:53+5:302015-12-12T22:53:53+5:30
कादवा कारखान्यातर्फे उसाचे पेमेंट वर्ग

कादवा कारखान्यातर्फे उसाचे पेमेंट वर्ग
कादवा : कादवा सहकारी साखर कारखान्याने सन २०१४-१५ मध्ये गाळप केलेल्या उसाचे प्रतिटन रु. ५१ प्रमाणे पेमेंट संबंधित ऊस उत्पादकांच्या बॅँक खात्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती चेअरमन श्रीराम शेटे यांनी दिली.
मागील वर्षी उसाची एफआरपी दोन हजार ११७ इतकी होती. यापूर्वी एक हजार ९४४ रुपये अदा केले होते. आता ५१ रुपये अदा केल्याने एकूण एक हजार ९९५ रुपये प्रत्येक उस उत्पादकास वर्ग करण्यात आले आहे. उर्वरित १२२ रुपये वर्ग करण्यात येणार आहे. या वर्षाचा गळीत हंगाम सुरू झाला असून, ३५ दिवसात कारखान्याने ५४ हजार ६२८ मे. टन गाळप केले आहे. या हंगामात गाळप होणाऱ्या उसासाठी केंद्र शासनाने कारखान्याची प्रतिटन रुपये दोन
हजार २१३ एफआरपी जाहीर केली आहे. (वार्ताहर)
ऊस भावात वाढ होत असल्याने सर्व सभासदांनी उसाची लागवड करावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. व्हा. चेअरमन उत्तमबाबा भालेराव, संचालक आदि उपस्थित होते.(वार्ताहर)