निफाड येथे २७ रोजी ऊस, कांदा परिषद

By Admin | Updated: July 24, 2014 01:02 IST2014-07-23T22:25:21+5:302014-07-24T01:02:02+5:30

निफाड येथे २७ रोजी ऊस, कांदा परिषद

Sugarcane, Onion Council, 27th at Niphad | निफाड येथे २७ रोजी ऊस, कांदा परिषद

निफाड येथे २७ रोजी ऊस, कांदा परिषद

निफाड : केंद्र सरकारने कांदा, बटाटा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकण्याच्या निषेधार्थ आणि कांद्याला, उसाला योग्य हमीभाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी (दि. २७) निफाड येथील मार्केट यार्डात ऊस व कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख निवृत्ती गारे यांनी दिली.
कांद्याला प्रतिक्विंटल ३००० रुपये, तर उसाला प्रतिटन एफ.आर. पी.नुसार २२०० अधिक ५० टक्के नफा ३३०० रुपये पहिला हप्ता मिळाला पाहिजे. या व इतर तसेच निसाका, रासाकाच्या प्रश्नावर या परिषदेत चर्चा होणार आहे. कांदा परिषदेमध्ये संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ पाटील, कालिदास आपेट, क्रांतिसिंह नानापाटील ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी नांदखिले, बाळासाहेब पठारे, पांडुरंग रायते आदि मार्गदर्शन करणार आहेत. स्वागताध्यक्ष जिल्हाध्यक्ष जगन्नाथ नाठे आहेत. (वार्ताहर)

Web Title: Sugarcane, Onion Council, 27th at Niphad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.