शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांच्या चार्‍यासाठी ऊसाला मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 18:28 IST

रसवंतीगृह बंद असल्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांना स्वतःच्या वाहनात ऊस भरून ऊस घेता का ऊस अशी विनवणी करत फिरायची वेळ आली आहे.

ठळक मुद्दे चार्‍यासाठी महागड्या भावाने ऊस खरेदी करण्याची वेळ

नाशिक : हिरवा मका उपलब्ध होत नसल्याने व सर्वत्र चार्‍याची टंचाई असल्याने जनावरांच्या चार्‍यासाठी शेतकर्‍यांकडून उसाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.मागील वर्षीच्या पावसाळ्याच्या हंगामा समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे सर्वच पिके जोमदार आली. निफाड तालुक्यातील गोदाकाठ भागातील सायखेडा, चांदोरी चाटोरी, हिवरगाव, करंजगाव, म्हाळसाकोरे, सोनगाव या गावांमध्ये शेतकरी उसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात. परिपक्व झालेला ऊस शेतकरी व्यापार्‍यांना अथवा स्वतःच्या वाहनाने रसवंती अथवा ऊस लागवडीसाठी किंवा जनावरांच्या चार्‍यासाठी विक्री करतात. यावर्षी मार्च ते मे हे तीन महिने लॉकडाऊन असल्याने रसवंती पूर्णपणे बंद होत्या. तसेच साखर कारखान्यांचा गळीत हंगाम उरकला होता. त्यामुळे उसाला मागणी घटली. रसवंतीगृह बंद असल्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांना स्वतःच्या वाहनात ऊस भरून ऊस घेता का ऊस अशी विनवणी करत फिरायची वेळ आली आहे. सध्या हे शेतकरी पंचाळे, देवपूर, मिठसागरे या गावांमध्ये करत आहे. तसेच काही शेतकरी हे व्यापार्‍यांना व वाहनचालकांना बाराशे ते चौदाशे रुपये प्रतिटन घाऊक भावाने ऊस होलसेल भावाने विक्री करतात. तोच ऊस व्यापारी, वाहनचालक हे तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर जाऊन 2400 रुपये प्रतिटन या भावाने विक्री करत आहेत. त्यामध्ये उसाच्या बाड्यांचे (वाड्यांचे) वजन वजा केले जात नाही. जनावरांना सध्या हिरवा मका चार्‍यासाठी उपलब्ध नसल्याने तसेच चार्‍याची टंचाई असल्याने उसाला शेतकर्‍यांकडून मोठी मागणी होत आहे. एक टन चारा 5 जनावरांसाठी पाच दिवसच पुरतो. मात्र पर्याय नसल्याने शेतकर्‍यांना जनावरांच्या चार्‍यासाठी महागड्या भावाने ऊस खरेदी करण्याची वेळ आली आहे

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी