सिडकोत फिरताहेत ब्रेक फेल घंटागाड्या

By Admin | Updated: May 8, 2016 00:28 IST2016-05-07T22:50:30+5:302016-05-08T00:28:05+5:30

मनपाचा अजब कारभार : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Suddenly breaks the breaks in the gutter | सिडकोत फिरताहेत ब्रेक फेल घंटागाड्या

सिडकोत फिरताहेत ब्रेक फेल घंटागाड्या

 सिडको : महापालिकेच्या वतीने नागरिकांचा दैनंदिन कचरा गोळा करण्यासाठी घरापर्यंत घंटागाडीची व्यवस्था करण्यात आली आहे, परंतु गेल्या काही महिन्यांपासून सिडको भागात फिरणाऱ्या घंटागाड्यांची दयनीय अवस्था झाली असून, यातील काही घंटागाड्यांचे तर ब्रेक फेल झालेले आहेत.
स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक अशी संकल्पना मनपाकडून मांडण्यात येत असली तरी मनपाच्या सिडको भागातील आरोग्य विभागाचे कामकाज अत्यंत ढिसाळ व नियोजनशून्य पद्धतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. सिडको भागात मुख्य रस्त्याबरोबरच ठिकठिकाणी कचरा साचलेला असतो. मनपा कर्मचारी हेदेखील वरवर कामकाज करीत असतानाही याकडे अधिकारी लक्ष देत नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सिडको भागात अनियमित घंटागाड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. काही भागात घंटागाड्या फिरकतच नसून यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव रस्त्यालगत कचरा फेकून द्यावा लागत आहे.
सिडको प्रभागात ११ प्रभागांसाठी २२ घंटागाड्या असल्या तरी यातील बहुतांशी घंटागाड्यांची दयनीय अवस्था झाली आहे. काही घंटागाड्यांचे ब्रेकच नादुरस्त आहेत. काही महिन्यांपूर्वी घंटागाडीच्या चाकाखाली सापडून एकाचा मृत्यू झाला असतानाही मनपाला जाग येत नसल्याने महिला व नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकदा घरांतील शाळकरी मुलेदेखील कचरा टाकण्यासाठी जात असून, बे्रक फेल घंटागाडीमुळे एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (वार्ताहर)

Web Title: Suddenly breaks the breaks in the gutter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.