शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अ‍ॅँटिजेन टेस्ट अचानक कमी करण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 01:30 IST

शहरात कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात चाचण्या घेऊन साखळी तोडल्याचे सांगण्यात येत असले तरी आता मात्र, प्रशासनाने या चाचण्या मर्यादित स्वरुपात करण्याचा निर्णय घेतला असून, अनेक भागातील चाचण्यांचे काम मंगळवारी (दि. ८) थांबविण्यात आले आहे. आयसीएमआरच्या निर्णयानुसारच प्रशासनाने अशी भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देमनपाच्या भूमिकेबद्दल आश्चर्य : आता स्वॅबवर देणार भर

नाशिक : शहरात कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात चाचण्या घेऊन साखळी तोडल्याचे सांगण्यात येत असले तरी आता मात्र, प्रशासनाने या चाचण्या मर्यादित स्वरुपात करण्याचा निर्णय घेतला असून, अनेक भागातील चाचण्यांचे काम मंगळवारी (दि. ८) थांबविण्यात आले आहे. आयसीएमआरच्या निर्णयानुसारच प्रशासनाने अशी भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले. तथापि, एकीकडे बाधितांची संख्या वाढत असतानादेखील त्याच्या नियंत्रणासाठी ते आवश्यक असल्याचे सांगून समर्थन करणाऱ्या प्रशासनाने आता मात्र अचानक भूमिका बदलल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.शहरात ६ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर जून अखेरपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या मर्यादित होती. मात्र, नंतर जुलै महिन्यात रुग्णांची संख्या वाढ होऊ लागली. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले. अशावेळी महापालिकेने चाचण्या तर वाढविल्याच; परंतु भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून मिशन झिरो नाशिकला सुरुवात केली होती. त्यासाठी संघटनेने २२ रुग्णवाहिकादेखील उपलब्ध करून दिल्या होत्या. सुरुवातीला शहरातील दाट वस्तीत आणि अन्यत्र कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी ही मोहीम राबविण्याचे ठरवण्यात आले होते. चाचण्या वाढल्याने बाधितांची संख्या वाढत असली तरी त्यामुळे लवकर रुग्ण शोधून त्याच्यावर तातडीने उपचार केले जात असल्याने सुप्तावस्थेतील अशा रुग्णांमुळे अन्य नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना होणारा संसर्ग टाळण्यात येत असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात येत होते. त्यामुळे शहरात बाधितांची संख्या वाढत गेली आणि एकेका दिवसात पाचशे ते सातशे रुग्ण आढळत आहेत. असे असताना आता मात्र प्रशासनाने या चाचण्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.दाट लोकवस्तीमध्ये करणार चाचण्याआयसीएमआरच्या ३ सप्टेंबरच्या आदेशाप्रमाणे, आता कार्यवाही करण्यात येणार असून, त्यामुळे ज्या ठिकाणी रुग्ण आढळेल, त्या ठिकाणी दाट वस्ती असेल तर तेथे चाचण्या केल्या जातील. बाधित रुग्णाच्या कुटुंबातील, जोखमीच्या संपर्कातील व्यक्तींचीदेखील तपासणी करण्यात येईल. त्यातील लक्षणे नसणाऱ्यांना घरीच क्वॉरण्टाइन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे मनपाच्या सर्व फीव्हर क्लिनिकमध्येदेखील चाचण्या करण्यात येणार आहेत.दोन ते तीन दिवसात शहराच्या बहुतांशी भागात चाचण्या बंद करण्यात आल्या असून, अनेक भागातील नागरिकांना माघारी फिरावे लागले. आता आयसीएमआरच्या नियमानुसार फक्त दाट वस्तीत आणि जोखमीच्या संपर्कातील व्यक्तींच्याच चाचण्या करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या सूत्रांनी सांगितले. तथापि, अशाप्रकारे टेस्ट कमी झाल्यास नागरिकांना मात्र आता खासगी लॅबचा आधार घ्यावा लागणार असून, त्यामुळे वाढीव भुर्दंड सोसावा लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या