स्वत:च्या मृत्यूचा बनाव करणारा संशयित शरण

By Admin | Updated: July 4, 2017 00:08 IST2017-07-04T00:08:13+5:302017-07-04T00:08:32+5:30

विम्याच्या रकमेसाठी रचला होता बनाव

A succession of asylum seekers | स्वत:च्या मृत्यूचा बनाव करणारा संशयित शरण

स्वत:च्या मृत्यूचा बनाव करणारा संशयित शरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : अपघाती मृत्यूनंतर मिळणाऱ्या विम्याच्या चार कोटी रुपयांसाठी स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचणारा प्रमुख संशयित रामदास पुंडलिक वाघ हा अखेर पोलिसांना शरण आला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्र्यंबकेश्वर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
जव्हार-त्र्यंबकेश्वर रोडवरील तोरंगण घाटात संरक्षक भिंतीजवळ ९ जून रोजी मृतदेह आढळून आला होता. अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला होता़ मृतदेहाच्या कपड्यांची तपासणी केल्यानंतर त्यात एचडीएफसी व महिंद्रा कोटक बँकेचे एटीएम कार्ड आणि लाईट बिल आढळून आले. तसेच एमएच १५ डीटी ८५३ क्रमांकाची सीबीझेड एक्स्ट्रिम दुचाकीही आढळून आली होती़ या कागदपत्रांवरून रामदास पुंडलिक वाघ (३९, रा. तांगडी शिवार, ता. चांदवड) यांचा हा मृतदेह असल्याचे समोर आले़
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदनानंतर दिलेल्या अहवालात गळा आवळून तसेच डोक्यात, तोंडावर टणक हत्याराने वार केल्याने वाघ यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले व त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला़
जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोथ घेण्यासाठी वेळोवेळी आढावा घेऊन मार्गदर्शन केले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले व त्यांच्या पथकाने वेळोवेळी रामदास वाघ व त्याचे मित्र, नातेवाईक यांच्याकडे तपास केला. त्याचबरोबर त्याच्या आप्तस्वकियां-कडेही शोध घेतला. अखेर नाशिक शहरातील सरकारवाडा पोलीस स्टेशनला जाऊन त्याने शरणागती पत्करली.पोलिसांमुळे बनाव उघड
चाणाक्ष ग्रामीण पोलिसांच्या तपासामुळे या प्रकरणातील बनाव उघडकीस आला. या घटनेतील चौघा संशयितांनी मृतदेहासाठी एका हॉटेल कर्मचाऱ्याचा खून करून त्याचा मृतदेह त्र्यंबकेश्वर रोडवरील अंबाई शिवारातील तोरंगण घाटात ठेवून अपघाताचा बनाव रचला होता़ ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणातील तिघा संशयितांना यापूर्वीच अटक केली असून, मुख्य संशयित रामदास वाघ याचा पोलीस शोध घेत होते.

Web Title: A succession of asylum seekers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.