आरोग्य खात्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:19 IST2021-08-27T04:19:38+5:302021-08-27T04:19:38+5:30

लासलगाव भाजप मंडल, शहर भाजप तसेच भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत डॉ. भारती पवार यांचे ...

Successfully fulfill the responsibility of the health department | आरोग्य खात्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू

आरोग्य खात्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू

लासलगाव भाजप मंडल, शहर भाजप तसेच भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत डॉ. भारती पवार यांचे जोरदार स्वागत केले. सर्वप्रथम भारती पवार यांनी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर मेनरोड मार्गे त्यांची जनआशीर्वाद यात्रा लासलगावचे आराध्यदैवत भगरी बाबा मंदिरात पोहोचली. येथे समाधीचे दर्शन घेतले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी पवार यांचा लासलगाव भाजप मंडल, शहर भाजपच्या वतीने शाल, श्रीफळ तसेच सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुवर्णा जगताप यांनी केले

केंद्र सरकारने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोरोना महामारीच्या संकटात सर्वच घटकांनी एकजुटीने प्रयत्न केले असून, देशातील ५५ कोटींपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. असे काम करणारा भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश ठरला आहे. मोदी सरकार शेतकरीविरोधी नसून शेतकरीहिताचे आहेत. केंद्र सरकारने शेतकरीहिताच्या अनेक योजना राबविल्या असून त्यामध्ये कृषी कायदा, किसान रेल, शेतकरी सन्मान योजना तसेच नाशिक जिल्ह्यात द्राक्ष क्लस्टरसाठी १०० कोटींचा निधी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिला असल्याचे यावेळी डॉ. पवार यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.

यावेळी केदा आहेर, चांदवड बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, जि. प. सदस्य डी. के. जगताप, माजी पंचायत समिती सदस्य कैलास सोनवणे यांचीही भाषणे झाली.

याप्रसंगी ग्रामीण संघटन सरचिटणीस सुनील बच्छाव, संघटन मंत्री राविजी अनासपुरे, भागवत बोरस्ते, शंकरराव वाघ, संजय शेवाळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संपत नागरे, संतोष पलोड, राजू राणा, शहराध्यक्ष योगेश पाटील, रवींद्र होळकर, संतोष पवार, चिराग जोशी, संजय वाबळे, संजय गाजरे, परेश शहा, प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, निवृत्ती महाराज रायते, प्रदीप माठा, मनीष चोपडा, अरुण भांबारे, दत्तुलाल शर्मा, नितीन शर्मा, ज्योती शिंदे, महेश गिरी, उत्तम शिंदे, धनंजय डुंबरे, तुकाराम गांगुर्डे, भाऊसाहेब गांगुर्डे, नीलेश सालकाडे आदींसह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र चाफेकर यांनी केलले. आभार स्मिता कुलकर्णी यांनी व्यक्त मानले.

(२६ लासलगाव १)

लासलगाव येथे राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा सत्कार करताना केदा आहेर, डॉ. आत्माराम कुंभार्डे, सुनील बच्छाव, डी. के. जगताप, सुवर्णा जगताप व भाजपचे पदाधिकारी.

260821\26nsk_32_26082021_13.jpg

लासलगाव येथे डॉ. भारती पवार यांचा सत्कार करतांना केदा आहेर, डॉ. आत्माराम कुंभार्डे, सुनील बच्छाव, डी. के. जगताप, सुवर्णा जगताप व भाजपचे पदाधिकारी.

Web Title: Successfully fulfill the responsibility of the health department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.