महाआरोग्य शिबिरातंर्गत लठ्ठपणावर यशस्वी शस्त्रक्रिया
By Admin | Updated: April 18, 2017 14:21 IST2017-04-18T14:21:58+5:302017-04-18T14:21:58+5:30
महाआरोग्य शिबिरातंर्गत लठ्ठपणावर यशस्वी शस्त्रक्रिया

महाआरोग्य शिबिरातंर्गत लठ्ठपणावर यशस्वी शस्त्रक्रिया
नाशिक : महाआरोग्य शिबिरांतर्गत आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना विनामुल्य उपचार मिळत असून यावेळी या शिबीरांतर्गत प्रथमच लठ्ठपणा आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जिल्हयातील २७७ रुग्ण लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्या रुग्णांची तपासणी बेरीट्रीक सर्जन डॉ.जयश्री तोडकर यांनी महाआरोग्य शिबिरादरम्यान उपस्थित राहून केली होती. यापैकी ४० रुग्णांना लठ्ठपणाच्या शस्त्रक्रिया सुचविण्यात आल्या होत्या. तर अन्य रुगणांना आवश्यक वैद्यकीय सल्ला व औषधे देण्यात आला होती.