टोकन पद्धतीने बाजरीची लागवड यशस्वी

By Admin | Updated: August 27, 2016 00:02 IST2016-08-27T00:00:15+5:302016-08-27T00:02:09+5:30

यशोगाथा : पिंपळखुटेच्या शेतकऱ्याचा प्रयोग

Successful cultivation of millet in token method | टोकन पद्धतीने बाजरीची लागवड यशस्वी

टोकन पद्धतीने बाजरीची लागवड यशस्वी

 बाळासाहेब सोमासे जळगाव नेऊर
जळगाव नेऊर : येवले तालुक्यात तसे बाजरी पिकाचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे .पिकाचे उत्पादन कमी त्यात भाव देखिल कमी. त्यामुळे शेतकरी या पिकाकडून कांदे, कपाशी ,मका या पिकांकडे वळले .मात्र तालुक्यातील पिपळखुटे खुर्द येथिल प्रगतिशील शेतकरी ज्ञानेश्वर आसाराम रोठे या तरु ण शेतकऱ्याने बाजरी पिकाचे उत्पन्न वाढविण्यासाठी टोकन पद्धतीने बाजरी लगवाडीचा अभिनव प्रयोग राबविला आहे. या प्रयोगाने त्यांच्या उत्पन्नात वाढ झालीच पण पीक व्यवस्थापनही सोपे झाले आहे .
रोठे यांनी मका लागवडी प्रमाणे दोन वोळीत दोन फुटांचे अंतर ठेवून दोन रोपांत नऊ इंचाचे अंतर ठेवून टोकन पद्धतीने लागवड केली. परंपरागत खते फेकून न देता मक्याप्रमाणे रासायनिक खतांची मात्रा पिकाजवळ रांगोळी पद्धतीने दिली.पीक लहान असताना पिकात कोळप व लहान वखराच्या पाळ्या दिल्या . त्यामुळे तन व्यवस्थापन सोपे झाले .पिकाला पुरेशी जागा मिळाली . हवा व सूर्यप्रकाश भरपूर मिळाला. रोपांना प्रत्येकी ८ ते १० फुटवे आले. हे सर्व फुटवे इतके जोमदार आले की सर्व फुटव्यांना सारख्याच व मोठ्या अकाराची कणसे आली . पीक जोमदार आले. रोठे यांनी मागील वर्षी फक्त १० गुंठे क्षेत्रावर हा प्रयोग केला होता .तेव्हा १० गुंठयात त्यांना ७ पोते उत्पन्न मिळाले .
यावर्षी त्यांनी एक एकरावर हा प्रयोग केला आहे. यावर्षी पाऊस चांगला असल्याने पीक मागील वर्षीपेक्षा चांगले आले आहे त्यातून त्यांना २८ ते ३० पोते उत्पन्न मिळण्याची खात्री आहे. शिवाय पिकाचे क्षेत्र मकापेक्षा लवकर रिकामे होणार आहे . बाजरी काढल्यानंतर त्यात ते कांदा लागवड करणार आहेत. कमी खर्च व कमी वेळेत जास्त उत्पादन मिळणाऱ्या या प्रयोगाकडे इतर शेतकरी कुतुहलाने पाहत आहेत.

Web Title: Successful cultivation of millet in token method

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.