भरकटलेल्या १३ पर्यटकांना ७ तासाच्या प्रयत्नानंतर उतरवण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2021 12:05 AM2021-08-31T00:05:29+5:302021-08-31T00:06:15+5:30

इगतपुरी : तालुक्यातील कुरुंगवाडी जवळील कुलंग गड किल्ल्यावर काल रविवार दि. २९ रोजी गुजरात येथील १३ पर्यटक पर्यटनासाठी गेले होते. मात्र परत खाली येत असतांना रात्र झाल्यामुळे त्यांना खाली उतरण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने ते किल्ल्यावरच अडकले होते. या बाबतची माहिती इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे व आपत्ती व्यवस्थापन टीमला फोन वरून समजली असता त्यांनी आज सकाळी रेस्क्यु ऑपरेशन राबवत ८ पुरुष, २ महिला व ३ मुले असे १३ पर्यटकांना सुखरूप किल्ल्यावरून खाली काढण्यात यश आले.

Success in unloading 13 stray tourists after 7 hours of effort | भरकटलेल्या १३ पर्यटकांना ७ तासाच्या प्रयत्नानंतर उतरवण्यात यश

इगतपुरी तालुक्यातील कुरुंगवाडी येथील कुलंगगड किल्ल्यावरील पर्यटकांना सुखरूप बाहेर काढतांना आपत्ती व्यवस्थापन टीम.

googlenewsNext
ठळक मुद्देइगतपुरी तालुक्यातील कुलंग गड : आपत्ती व्यवस्थापन टीमच्या मदतीने सर्व पर्यटक सुखरूप बाहेर

इगतपुरी : तालुक्यातील कुरुंगवाडी जवळील कुलंग गड किल्ल्यावर काल रविवार दि. २९ रोजी गुजरात येथील १३ पर्यटक पर्यटनासाठी गेले होते. मात्र परत खाली येत असतांना रात्र झाल्यामुळे त्यांना खाली उतरण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने ते किल्ल्यावरच अडकले होते. या बाबतची माहिती इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे व आपत्ती व्यवस्थापन टीमला फोन वरून समजली असता त्यांनी आज सकाळी रेस्क्यु ऑपरेशन राबवत ८ पुरुष, २ महिला व ३ मुले असे १३ पर्यटकांना सुखरूप किल्ल्यावरून खाली काढण्यात यश आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील भावली डॅमजवळील कुरुंगवाडी येथील कुलंग गड किल्ल्यावर रविवारी गुजरात जवळील बडोदरा येथील पर्यटक आकाश विजयकुमार कसोरे, विजय दिनेश सोलंकी, माधवी अजित वामतोरे, प्रभू दस्त मासी प्रसाद, ग्लिम्स पंकज रॉयल, ग्लोरियस पंकज रॉयल, स्टेलोंन सुभाषकुमार क्रिस्टी, नीता संतोष मिश्रा, न्यास संतोष मिश्रा, चिलसी मेहुल परमार, रेक्स निसन मास्टर, प्रमोद अँडरसन, जोशीन देवेन सर्व राहणार बडोदा, गुजरात असे ८ पुरुष, २ महिला व ३ लहान मुले घेऊन दुपारी तीन वाजता गडावर चढले. मात्र परत येतांना रात्र झाल्याने आंधारात तडे, खाच खळगे व पायवाट दिसत नसल्याने ते तेथेच भरकटले. त्यात उशीरही झाल्यामुळे त्यांनी रात्री तेथेच थांबण्याचे ठरवले.

मात्र जंगलाचा परिसर असल्याने त्यांना भीती वाटायला लागली. नशीब चांगले म्हणून त्यांच्या मोबाइलला नेटवर्क होते. मदतीसाठी आपल्या नातेवाईशी व गावातील लोकांशी संवाद साधला आम्ही अडकलो आहे असे सांगत मदतीचा हात मागितला. त्यांनी रात्री ३ वाजेच्या सुमारास नाशिकच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी प्रांत तेजस चव्हाण यांच्याशी संपर्क करुन माहिती दिली. याबाबतची माहिती तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने आपत्ती व्यवस्थापनचे जिल्हा अधिकारी अर्जुन कुऱ्हाडे, इगतपुरीचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे, घोटीचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर व वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. पहाटे चार वाजता या आपत्ती व्यवस्थापन टीमचे नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अर्जुन कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन समितीचे चांदोरीचे सागर गडाख, किरण वाघ, बाळू आंबेकर, वैभव जमधडे, आकाश गायखे, फकिरा धुळे, विलास गांगुर्डे, विलास गडाख, शरद वायकांडे, केशव झुर्डे, अजय चारोस्कर आदीनी सदर कुलनगड किल्ल्याच्या पायथ्याशी जाऊन तेथील स्थानिकांच्या मदतीने त्यांनी शोध मोहीम सुरू केली.

दहा जन किल्ल्याच्या वेगवेगळ्या दिशेला शोध घेत होते. मोबाईल नेटवर्क असल्यामुळे व पर्यटक सतत आपत्ती व्यवस्थापन ग्रुपच्या संपर्कात होते. अखेर सात तासाच्या अथक प्रयत्नाने किल्ल्यावरून सर्व पर्यटकांना सुखरूप खाली काढण्यात यश आले. या मोहिमेत तहसील प्रशासन, पोलीस पथक, वनविभाग, महसुल कर्मचारी यांच्यासह स्थानिक नागरिक सहभागी झाल्याने या सर्वांच्या मदतीने सर्व पर्यटकांना सुरक्षित किल्ल्यावरून खाली उतरवण्यात यश आले.

आम्हाला रात्री माहिती मिळताच मी सदर पर्यटकांच्या संपर्कात राहून अडकलेल्या पर्यटकांचा धीर दिला घाबरू नका आम्ही काही मिनिटातच तुमच्या पर्यंत मोबाईलची एकच बॅटरी पापरा काही वेळातच आम्ही पोहोचू असे सांगत संपर्कात राहून त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले.

-अर्जुन कुऱ्हाडे, नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी.

 

Web Title: Success in unloading 13 stray tourists after 7 hours of effort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.