पंचवटी : राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन स्पर्धा दरभंगा बिहार येथे पार पडल्या. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने विजय मिळविला. कु. क्षितिजा नाटकर हिने शेवटच्या चेंडूचा झेल घेऊन महाराष्ट्राला यशाचे मानकरी बनविण्यासाठी महत्त्वाची कामगिरी करून ती सुवर्ण पदकाची मानकरी ठरली. मुलांच्या संघात शंतनू वाकचौरे, प्रद्युम्न काटे या दोघांचा समावेश होता तसेच कोल्हापूर येथे कराटे राज्यस्तरीय स्पर्धेत नयन म्हस्के याने रौप्य पदक, तर साहिल धात्रक याने कांस्य पदक पटकावले. शिर्डी येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत रूपक चांदूरकर याने रौप्य, तर आंध प्रदेश येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत श्रृती जाडर हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. या सर्व यशस्वी खेळाडूंचे शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. (वार्ताहर) फोटो कॅप्शन : विविध क्रीडा स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या खेळाडूंसमवेत स्वामी नारायण शाळेचे विश्वस्त स्वामी ज्ञानपुराणी महाराज, समवेत मुख्याध्यापक अस्मिता पटेल, अर्चना नाटकर आदिंसह विजेता संघातील स्पर्धेक
श्री स्वामी नारायण स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश
By admin | Updated: February 24, 2015 02:02 IST