राज्यस्तरीय क्र ीडा स्पर्धेत यश
By Admin | Updated: January 14, 2017 00:27 IST2017-01-14T00:26:58+5:302017-01-14T00:27:12+5:30
सुरगाणा : आश्रमशाळेतील खेळाडूंनी पटकावली १०८ पदके

राज्यस्तरीय क्र ीडा स्पर्धेत यश
सुरगाणा : कोकमठाण (जि. नगर) येथे नुकत्याच पार पडलेल्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत नाशिक विभागातून कळवण प्रकल्पांतर्गत तालुक्यातील आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ, अलंगुण या शिक्षण संस्थेच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करून १२८ पदके पटकावली.
राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन नगर जिल्ह्यातील कोपरगाजवळील कोकमठाण येथील जंगलीदास महाराज ट्रस्ट याठिकाणी करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध ठिकाणच्या आश्रमशाळांनी सहभाग घेतला. यामध्ये तालुक्यातील
आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ, अलंगुण या शिक्षण संस्थेतील अलंगुण, चिंचला, श्रीभुवन, भेगू, सावरपाडा, खिर्डी येथील आश्रमशाळेतील ५२ मुले व ५३ मुली असे १०५ विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थी खेळाडूंनी स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करून ८२ सुवर्ण, २३ रजत व २३ कांस्य अशी एकूण १२८ पदके पटकावून उपस्थित सर्वांची वाहवा मिळविली.
याप्रसंगी आमदार गावित यांनी क्रीडाशिक्षकांचे योग्य मार्गदर्शन, विद्यार्थ्यांचे कार्य, त्यांचे श्रम व केलेल्या मेहनतीचे हे फळ असून,
हा मोठा गौरव असल्याचे सांगितले. नववर्ष संस्थेसाठी सुवर्ण वर्ष
म्हणून मानले जाईल, असेही ते म्हणाले. (वार्ताहर)