एसएनजेबी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:46 IST2020-02-13T22:58:05+5:302020-02-14T00:46:08+5:30
श्री. नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची टीम द स्पार्टन्सने नाशिक पाठोपाठ पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या अॅटो रेसिंग चॅम्पियनशिप - ०४ या राष्ट्रीय स्पर्धेत पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाची छाप उमठवत तीन पुरस्कार पटकाविले आहेत.

चांदवड अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी उपस्थित एम. डी. कोकाटे, एस. डी. संचेती, एम. आर. संघवी, डी. डी. संचेती आदी़
चांदवड : येथील श्री. नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची टीम द स्पार्टन्सने नाशिक पाठोपाठ पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या अॅटो रेसिंग चॅम्पियनशिप - ०४ या राष्ट्रीय स्पर्धेत पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाची छाप उमठवत तीन पुरस्कार पटकाविले आहेत.
राष्ट्रीय स्तरावर झालेल्या स्पर्धेत देशभरातून ४० संघांनी सहभाग नोंदविला होता. अतिशय खडतर अशा चाचण्या पार करत गो-कार्ट कारने हा विजय मिळविला आहे. या स्पर्धेत टीम द स्पार्टन्स बनविलेल्या वॉर हॅमर २.०(गो-कार्ट कार) ने प्रवेग चाचणीत १०० मीटर अंतर ४.९० सेकंद या विद्युत वेगाने पार करीत (दहा हजार रु पये)रोख रक्कम व प्रथम पारितोषिक पटकाविले व त्याचबरोबर सीएइ चाचणीत सुद्धा (दहा हजार रु पये) रोख रक्कम व प्रथम पारितोषिक पटकाविले आहे. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या या कारच्या अप्रतिम डिझाईन व अस्थेटिकला रोख पाच हजार रु पये व द्वितीय पारितोषिक प्रदान करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रा. डी. डी. संचेती यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या टीम द स्पार्टन्समध्ये कॅप्टन चैतन्य ठाकूर व रायडर तुषार कुंभार्डे सह १६ विद्यार्थ्यांचा समावेश होता. या कारचे संपूर्ण डिझाईन महाविद्यालयाच्या वर्कशॉप मध्येच करण्यात आले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे समन्वयक दिनेशकुमार लोढा, झुंबरलाल भंडारी, सुनिलकुमार चोपडा, एम. डी. कोकाटे, एस. डी. संचेती यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला़