शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

अतिकुपोषित बालकाला वाचविण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:32 IST

तालुक्यातील फणसपाडा येथील छगन ढोलेनामक कुपोषित बालक. त्याच्या वयाच्या मानाने तब्बल अर्ध्याहून अधिक त्याचे वजन; परंतु सामाजिक दातृत्वाच्या भावनेतून सोशल नेटवर्किंग फोरमच्या कुपोषण मुक्त चळवळीच्या माध्यमातून त्यास वीस दिवस उपचार करून जणू नवजीवन मिळाल्याने त्या बालकासह त्याच्या पालकांच्या चेहºयावर हसू उमटू लागले.

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील फणसपाडा येथील छगन ढोलेनामक कुपोषित बालक. त्याच्या वयाच्या मानाने तब्बल अर्ध्याहून अधिक त्याचे वजन; परंतु सामाजिक दातृत्वाच्या भावनेतून सोशल नेटवर्किंग फोरमच्या कुपोषण मुक्त चळवळीच्या माध्यमातून त्यास वीस दिवस उपचार करून जणू नवजीवन मिळाल्याने त्या बालकासह त्याच्या पालकांच्या चेहºयावर हसू उमटू लागले.  कुपोषण मुक्तीच्या या सामाजिक कार्यात यश आल्याने फोरमच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे, असे असताना प्रमोद गायकवाड यांनी या चळवळीत सहभागी असलेल्या सर्व घटकांचे आभार मानत यापुढेही कार्य चालू राहणार असल्याचे सांगत एका बालकाला मरणाच्या दारातून परत आणण्याचा आनंद झाला असल्याचे सांगितले.  सोशल नेटवर्किंग फोरमने नाशिकच्या बालरोग तज्ज्ञ संघटना, आयएमए, नाशिक शाखा, केमिस्ट अ‍ॅॅण्ड यांना सोबत घेत तालुक्यातील वैैैद्यकीय अधिकारी वर्ग व फोरमच्या टीमच्या साथीने कुपोषण विषयावर काम करायचे ठरविल्यानंतर तालुक्यात कुपोषित बालके तपासणी करत असताना फणसपाडा येथे छगन ढोले हे बालक अत्यंत अत्यवस्थ अवस्थेत सापडलं. गेले २०-२५ दिवस हॉस्पिटलच्या डॉक्टर्स आणि उपक्रमातील सक्रिय सदस्य डॉ. तृप्ती महात्मे, डॉ.दीपा जोशी मॅडम, फोरमचा व्यवस्थापक सचिन शेळके व अन्य सहकाºयांनी वैयक्तिक लक्ष देऊन उपचार केले. त्याला पूरक आहार दिला. परिणामस्वरूप गेल्या २० दिवसात छगनचं वजन ३ किलोने वाढून साडेआठ किलो झाले आणि तो हसू खेळू लागला. काल छगनला डिस्चार्ज मिळाला तेव्हा त्याचा हसरा चेहरा पाहून आनंद ओसंडून वाहत होता. वयाच्या मानाने अपेक्षित असलेल्या वजनापेक्षा केवळ साडेपाच किलो होतं. डोळे उघडता येतील इतकेही त्राण त्याच्यात नव्हते. सोबत न्यूमोनिया, कान फुटलेले असे अन्य आजार असल्याने छगनला अधिक उपचारासाठी अ‍ॅडमिट केलं नाही तर दगावेल, असे डॉ. सुलभा पवार यांनी सांगितले. सर्व खर्च करण्याची तयारी दाखवत फोरमच्या सभासदांनी त्याच दिवशी अंगावरच्या कपड्यांनिशी स्वत:च्या गाडीत टाकून मविप्र कॉलेज हॉस्पिटलला छगनला अ‍ॅडमिट केले. कपडे, जेवणाची सोय केली. त्याच दिवसापासून छगनवर उपचार सुरू झाले. लागणारी सर्व औषधं पुरवली.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलNashikनाशिक