रंगूबाई जुन्नरे शाळेचे शिष्यवृत्तीत यश
By Admin | Updated: August 2, 2014 01:23 IST2014-08-02T00:40:14+5:302014-08-02T01:23:39+5:30
रंगूबाई जुन्नरे शाळेचे शिष्यवृत्तीत यश

रंगूबाई जुन्नरे शाळेचे शिष्यवृत्तीत यश
नाशिक : श्रीमती रंगूबाई जुन्नरे इंग्लिश शाळेच्या विद्यार्थ्यांनी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले. श्रेयस देशपांडे हा जिल्ह्यात १२वा आला. निखिल सोळंकी १३वा, जन्मजेय राशीनकर व अमित वरुडे या दोघांनी नाशिक जिल्ह्यात १७वा क्रमांक मिळविला. या विद्यार्थ्यांचा शालेय समिती अध्यक्ष दिलीप फडके, मुख्याध्यापिका रेखा रडके यांनी सत्कार केला.
या सर्व विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष दिलीप फडके, मुख्याध्यापिका रेखा रडके, शिक्षिका कांचन पाटील, राधा देसाई, सारिका रूळे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. (प्रतिनिधी)