बॉक्सिंग स्पर्धेत खैरनार हिचे यश

By Admin | Updated: December 19, 2015 23:09 IST2015-12-19T23:05:16+5:302015-12-19T23:09:31+5:30

बॉक्सिंग स्पर्धेत खैरनार हिचे यश

The success of Khairnar in boxing competition | बॉक्सिंग स्पर्धेत खैरनार हिचे यश

बॉक्सिंग स्पर्धेत खैरनार हिचे यश


वटार : नागपूर, भंडारा येथे झालेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत वटारच्या मोहिनी खैरनार हिने कांस्यपदक मिळविले. तिचा राज्यात तिसरा क्रमांक आला.या यशाबद्दल वटार ग्रामपंचायतीच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. सरपंच प्रशांत बागुल यांच्या हस्ते मोहिनी खैरनारचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच रामदास खैरनार, उपसरपंच पोपट खैरनार, प्रकाश खैरनार, फकीर खैरनार, मुख्याध्यापक पी. बी. खैरनार, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अनिल पाटील आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
घरची परिस्थिती हलाखीची असताना इतक्या मोठ्या यशापर्यंत पोहचणाऱ्या सावित्रीच्या लेकीची पंचक्र ोशीत वाहवा होत आहे. मोहिनीला एखाद्या समाजसेवी संघटना किंवा आमदार, खासदार निधीतून पुढील वाटचालीसाठी निधी उपलब्ध करून दिला, तर तिचे भवितव्य उज्ज्वल होईल. राज्यात तृतीय आलेली मोहिनी देशात प्रथम यायला वेळ लागणार नाही, असे मत मोहिनीच्या वडिलांनी व्यक्त केले. यावेळी कार्यक्र माला सरपंच प्रशांत बागुल, माझी सरपंच रामदास खैरनार, अनिल पाटील, संतोष खैरनार, योगेश बागुल, रविंद्र बागुल, मुरलीधर खैरनार आदि उपस्थित होते़

Web Title: The success of Khairnar in boxing competition