The success of the Janata Vidyalaya players | जनता विद्यालयाच्या खेळाडूंचे कबड्डीत यश

जनता विद्यालयाच्या खेळाडूंचे कबड्डीत यश

मेशी : देवळा तालुकास्तरीय १७ वर्षे वयोगटाखालील मुली आणि मुले यांच्या कबड्डी स्पर्धा रामेशवर येथील जनता विद्यालयात पार पडल्या. उद्घाटन देवळा तालुका क्रीडा प्रमुख बी.डी. खैरनार, आर.एस. निकम, उपसरपंच विजय पगार यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत मुलांच्या गटात शिवाजी हायस्कूल, उमराणा श्री शिवाजी हायस्कूल,देवळा यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे मुलींमध्ये जनता विद्यालय रामेश्वर (प्रथम) व डॉ. डी.एस. आहेर
आश्रम, विठेवाडी (द्वितीय) यांनी यश मिळविले.
प्रथम आलेल्या संघांची निवड जिल्हास्तरावर झाली आहे. पंच म्हणून सुनील आहेर, बापू गुंजाळ, व्ही.टी. कापडणीस होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी व्ही.डी. आहिरे, जी.टी. पगार, पी.
एस. सोनवणे, एम.के. आहेर, पी.के. पाटील, आर.एम. भामरे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: The success of the Janata Vidyalaya players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.