दिंडोरीतील विद्यार्थ्यांचे आॅलिम्पियाडमध्ये यश

By Admin | Updated: February 28, 2017 23:27 IST2017-02-28T23:27:10+5:302017-02-28T23:27:28+5:30

दिंडोरी : दिल्ली येथील सी.पी.एस आॅलिंम्पियाड या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या आॅलिंम्पियाड परीक्षेत जनता इंग्लिश स्कूल व ज्यू.कॉलेज या शाळेतील १६ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक मिळालेआहे.

Success in Dindori Students' Olympiad | दिंडोरीतील विद्यार्थ्यांचे आॅलिम्पियाडमध्ये यश

दिंडोरीतील विद्यार्थ्यांचे आॅलिम्पियाडमध्ये यश

दिंडोरी : दिल्ली येथील सी.पी.एस आॅलिंम्पियाड या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी क्रमिक अभ्यासक्र म व सामान्यज्ञान यावर आधारित आॅलिंम्पियाड परीक्षेत जनता इंग्लिश स्कूल व ज्यू.कॉलेज दिंडोरी या शाळेतील १६ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक, १०विद्यार्थ्यांना रौप्य पदक तर ९ विद्यार्थ्यांना ब्रांज पदक मिळालेआहे. सी.पी.एस आॅलिंम्पियाड न्यू.दिल्ली या संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी क्रिमक अभ्यासक्र म व सामान्यज्ञान अधिक प्राप्त करण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत जनता इंग्लिश स्कूल व ज्यू.कॉलेज दिंडोरी या शाळेतील१७४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य सी. बी. पवार , मार्गदर्शक शिक्षक ए. आर. शिंदे, एस. जे. उफाडे, पी. बी. जाधव, बी. के. उफाडे आदींचे मार्गदशन लाभले. (वार्ताहर)
 

Web Title: Success in Dindori Students' Olympiad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.