शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
4
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
6
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
7
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
8
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
9
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
10
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
11
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
12
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
13
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
14
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
15
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
16
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
17
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
18
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
19
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
20
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

संतुलित जीवनशैलीतूनच यशाची प्राप्ती शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 1:02 AM

दैनंदिन कामे करताना अनेकजण नोकरी, व्यवसाय  आणि कुटुंब यात समतोल साधू शकत नसल्याची तक्रार करतात. परंतु जीवनात यशस्वी होण्यासाठी  या दोन्ही गोष्टींना पुरेसा वेळ देणे गरजेचे असून, वेळेचा सदुपयोग  व शिस्तबद्ध नियोजनातून संतुलित जीवनशैली साधल्यास  कोणत्याही क्षेत्रात निश्चित यशप्राप्ती शक्य असल्याचे प्रतिपादन  राज्यसभेचे खासदार तथा मोटिवेशनल स्पीकर सुभाष चंद्रा यांनी केले.

ठळक मुद्देसंतुलित जीवनशैली साधल्यास  कोणत्याही क्षेत्रात निश्चित यशप्राप्ती ‘सुभाष चंद्राज् शो’ समाधान म्हणजे समतोल म्हणता येत नाही.

 नाशिक : दैनंदिन कामे करताना अनेकजण नोकरी, व्यवसाय  आणि कुटुंब यात समतोल साधू शकत नसल्याची तक्रार करतात.परंतु जीवनात यशस्वी होण्यासाठी  या दोन्ही गोष्टींना पुरेसा वेळ देणे गरजेचे असून, वेळेचा सदुपयोग  व शिस्तबद्ध नियोजनातून संतुलित जीवनशैली साधल्यास  कोणत्याही क्षेत्रात निश्चित यशप्राप्ती शक्य असल्याचे प्रतिपादन  राज्यसभेचे खासदार तथा मोटिवेशनल स्पीकर सुभाष चंद्रा यांनी केले.  अग्रवाल सभा व वनबंधू परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे स्वामिनारायण बॅन्क्वेट हॉलमध्ये आयोजित ‘सुभाष चंद्राज् शो’ दरम्यान ‘संतुलित जीवनशैली’ (वर्कलाइफ बॅलन्स) विषयावर ते बोलत होते. सुभाष चंद्रा म्हणाले, आयुष्यात नवीन काही सुरू करण्यासाठी जुने काही मागे ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागतो. परंतु अशा स्थितीत येणारी आव्हाने पेलत ध्येयप्राप्तीचे लक्ष ठेवून निर्णय घेण्याची गरज असते. त्यासाठी प्रतिभा आवश्यक असते. प्रतिभा हीच प्रगतीचे सत्य असल्याचेही ते म्हणाले.  प्रारंभी अग्रवाल सभेचे नेमीचंद पोद्दार, आर्कि. सुरेश गुप्ता वनबंधू परिषदेचे सुनील चांडक, अनिल मेहता यांनी सुभाष चंद्रा यांचे स्वागत केले. दरम्यान, समाजासाठी योगदान देणाºया नरेश कारडा, श्याम ढेडिया, विजय अग्रवाल, उपासना टिबडेवाल, प्रकाश लढ्ढा, दिवाकर येवलकर आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला. समाधान म्हणजे  समतोल नव्हे...अनेक व्यक्ती आयुष्य जगताना प्राप्त परिस्थितीशी समझोता करून घेतात. आपण समाधानी आहोत, असे ते म्हणतात. पण असले समाधान म्हणजे समतोल म्हणता येत नाही.  कोणाला कशासाठी होकार देणे म्हणजेच दुसºया बाजूने विचार करता अन्य कोणासाठी तो नकारही असू शकतो.   पैसा, प्रतिष्ठा व सत्ता या तिन्ही बाबी सर्वांना अपेक्षित असल्या तरी त्याचा क्रम प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळा असू शकतो. काश्मिरी तरुण भारतासोबतच काश्मिरी तरुण फुटीरतावाद्यांसोबत नसून ते भारतासोबतच असल्याचे खासदार सुभाष चंद्रा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. काश्मिरी मुस्लिमांना दहशतवाद नको तर शांती हवी असून, त्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. तसेच समाजातील क ाश्मिरी मुस्लिमांचा दहशतवादाशी संबंध असल्याचा गैरसमजही दूर करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.