ेजलतरण स्पर्धेत भोसलाच्या खेळाडूंचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 14:34 IST2019-03-17T14:33:50+5:302019-03-17T14:34:03+5:30
नाशिक : पुण्यातील बालेवाडी येथे झालेल्या ट्रायथलॉन आणि बायथल या जलतरण खेळांमध्ये येथील भोसला स्विमिंग क्लबच्या खेळाडूंनी यश मिळविले.

ेजलतरण स्पर्धेत भोसलाच्या खेळाडूंचे यश
नाशिक : पुण्यातील बालेवाडी येथे झालेल्या ट्रायथलॉन आणि बायथल या जलतरण खेळांमध्ये येथील भोसला स्विमिंग क्लबच्या खेळाडूंनी यश मिळविले. ट्रायथलॉन स्पर्धेत इशान राव, अबीर धोंड, वैष्णवी अहेर, राधिका महाले, अश्लेषा अहेर, अखिलेश बाळ, श्रावणी गडाख, ओंकार ढेरिंगे, विनायक कुंवर, वरद कुंवर यांची आंतरराष्टÑीय स्पर्धेसाठी निवड झाली. तर बायथल स्पर्धेत सुमेध कुलकर्णी, वैष्णवी अहेर, मेहेक तांबट, ओंकार ढेरिंगे, आदिती हेगडे, ओवी सहाणे, वेदांत गडाख, विलास सहाणे, अबीर धोंड यांची निवड करण्यात आली आहे. विविध वयोगटात या स्पर्धा खेळविल्या गेल्या. या खेळाडूंना साई प्रशिक्षक शंकर मादगुंडी, घनश्याम कुंवर, विलास देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे दिलीप बेलगावकर, हेमंत देशपांडे, जयेश पै आदींनी अभिनंदन केले आहे. (१५स्विमिंग)