उपनगरच्या लाचखोर पोलिसाला ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:41 IST2020-12-11T04:41:16+5:302020-12-11T04:41:16+5:30

जेलरोड, नारायणबापू चौक येथील पोलीस चौकीत कार्यरत असलेले सोनवणे यांनी गेल्या आठवड्यात पळसे येथील तक्रारदाराच्या वडिलांना पोलीस चौकीत ...

Suburban police were handcuffed | उपनगरच्या लाचखोर पोलिसाला ठोकल्या बेड्या

उपनगरच्या लाचखोर पोलिसाला ठोकल्या बेड्या

जेलरोड, नारायणबापू चौक येथील पोलीस चौकीत कार्यरत असलेले सोनवणे यांनी गेल्या आठवड्यात पळसे येथील तक्रारदाराच्या वडिलांना पोलीस चौकीत बोलावून गुन्ह्यात जामीन देण्यासाठी व मदत करण्यासाठी १० हजारांची मागणी केली होती. ‘पैसे दिले नाही तर तुम्हाला या गुन्ह्यात त्रास होईल’, असे सोनवणे यांनी त्यांना सांगितले होते. यावेळी राजेंद्र मोरे यांनी पैशाची व्यवस्था करतो, असे त्यांना सांगितले. आठ डिसेंबरला मुलगा आकाशला पैसे घेऊन पाठवा, असे सोनवणे यांनी सांगितले होते. दरम्यान, ७ डिसेंबरला मोरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे जाऊन तक्रार केली. या विभागाच्या पथकाचे कर्मचारी खातरजमा करण्यासाठी मंगळवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास नारायण बापू चौकातील पोलीस चौकीत तक्रारदारासोबत गेले असता सोनवणे यांनी पैशांची मागणी केली. पथकाला १० हजारांची लाचेची खातरजमा झाल्यानंतर बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास आकाशने पोलीस चौकीत सोनवणे यांना लाचेची रक्कम १० हजार रुपये देण्यासाठी आला असता रचलेल्या सापळ्यात त्याच्याकडून रक्कम स्वीकारताना सोनवणे रंगेहात अडकले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Suburban police were handcuffed