कांदा, टोमॅटो प्रक्रिया उद्योगांना मिळणार अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:11 IST2021-07-22T04:11:19+5:302021-07-22T04:11:19+5:30
वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बॅंक कर्जाशी निगडित एकूण पात्र प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के जास्तीतजास्त रु. १० ...

कांदा, टोमॅटो प्रक्रिया उद्योगांना मिळणार अनुदान
वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बॅंक कर्जाशी निगडित एकूण पात्र प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के जास्तीतजास्त रु. १० लाखांच्या मर्यादेत अनुदान दिले जाणार आहे, तर सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये कार्यरत स्वयं सहायता गटातील सदस्यांना खेळते भांडवल व छोटी मशिनरी घेण्याकरिता प्रती सदस्य चाळीस हजार बीज भांडवल रक्कम देण्यात येणार आहे.
चौकट-
कांदा, टोमॅटो, सोयाबीन, मका प्रक्रिया उद्योग
कांदा फ्राइड कांदा, पेस्ट, पावडर, ऑइल, सॉस, लोणचे इत्यादी. टोमॅटो-केचअप, जाम, प्युरी, सॉस, कॅन टोमॅटो, पेस्ट, टोमॅटो चटणी, सूप, ज्यूस, लोणचे इत्यादी. दुग्ध व दुग्धजन्य - बासुंदी, पनीर, लोणी, चीज, आइसक्रीम, तूप, लस्सी, श्रीखंड, ताक, पेये, विप क्रीम, फॅट मिल्क, दही, दूध पावडर, व्हे प्रोटीन, खवा, मावा, छन्ना, संदेश, पेढा, कलाकंद, कुल्फी, रबडी, बर्फी, चक्का, श्रीखंड वडी, रसमलाई, रसगुल्ला इत्यादी. मका, कॉर्न सिरप, पीठ, ऑइल, स्टार्च, सॉस, पॉपकॉर्न इत्यादी. सोयाबीन तेल, टोफू, सोयामिल्क, सोयानट, सोयाचन्क, सोया प्रोटीन, सोया सॉस, सोया स्टिक, सोया चिप्स, पीठ आदी विविध प्रक्रिया उद्योगांना या योजनेत आर्थिक साहाय्य मिळू शकते.