शहर अभियंत्यांना निवेदन सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 23:32 IST2019-12-29T23:31:37+5:302019-12-29T23:32:39+5:30
समस्यां सोडविण्याबाबत महापालिका प्रशासन लेखी वा तोंडी आश्वासन देते, मात्र कुठल्याही प्रकारची पूर्तता करीत नसल्याने युवा संघटनातर्फे शहर अभियंता कैलास बच्छाव यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.

मालेगाव येथील प्रभाग ९ मधील समस्यांबाबत शहर अभियंता कैलास बच्छाव यांना निवेदन सादर करताना मालेगाव युवा संघटनेचे देवा पाटील, निखिल पवार, आनिल पाटील, भावडू पाटील, मुन्ना पाटील, गणेश लोखंडे, अमित अलई आदी.
मालेगाव : प्रभाग क्र मांक ९ मधील समस्यां सोडविण्याबाबत महापालिका प्रशासन लेखी वा तोंडी आश्वासन देते, मात्र कुठल्याही प्रकारची पूर्तता करीत नसल्याने युवा संघटनातर्फे शहर अभियंता कैलास बच्छाव यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.
तत्कालीन आयुक्त रवींद्र जगताप यांनी कामे पूर्ण करण्याचे आश्वासने दिले होते. प्रभार्गातील समस्यांना गेल्या बऱ्याच वर्षांपासून नागरिक तोंड देत आहेत. नवजीवन हॉस्पिटल एंडाईत मळापासून दीपक टॉकीजपर्यंतचा रस्ता, क्रीडा संकुलपासून बाफना ज्वेलर्सपर्यंतचा रस्ता ठेकेदाराकडून पुन्हा करवून घेण्यासाठी आंदोलनही करण्यात आले होते. शहर अभियंता यांनी लेखी आश्वासन दिले होते; परंतु आजपर्यंत कुठलीही कार्यवाही झालेली नाही. क्रीडा संकुलपासून बाफना ज्वेलर्सला लागून सटाणा रोडपर्यंतची गटारीमुळे दुर्गंधी वाढली आहे. प्रभागात डुकरांसह श्वानांचा त्रास वाढला आहे. प्रभागात वेळेवर औषध फवारणी केली जात नाही आदी समस्या मांडण्यात आल्या आहेत. निवेदनावर देवा पाटील, निखिल पवार, आनिल पाटील, भावडू पाटील, मुन्ना पाटील, गणेश लोखंडे, शरद पाटील बिपीन पटाईत आदींच्या सह्या आहेत.