आरक्षण नाकारणाऱ्या संचालकांवर गुन्हे दाखल करा
By Admin | Updated: August 26, 2016 00:49 IST2016-08-26T00:45:31+5:302016-08-26T00:49:26+5:30
जनता दलाची मागणी

आरक्षण नाकारणाऱ्या संचालकांवर गुन्हे दाखल करा
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कंत्राटी नोकरभरतीत अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण डावलून नियमबाह्ण भरती करणाऱ्या बॅँकेच्या संचालकांवर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी जनता दलाचे सचिव डॉ. गिरीश मोहिते यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.
विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात डॉ. गिरीश मोहिते यांनी म्हटले आहे की, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाने आर्थिक व्यवहारातून ४०० कर्मचाऱ्यांची रोजंदारी नोकरभरती केली आहे. ही भरती करताना आरक्षणाचे नियम पाळले नाहीत. त्यामुळे ही भरती रद्द करण्याचे आदेश विभागीय सह निबंधकांनी जिल्हा बॅँकेला देऊनही जिल्हा बॅँकेने ही कंत्राटी नोकरभरती रद्द केलेली नाही. आरक्षणाचे निकष डावलून भरती करणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक मंडळ यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत.
तसेच सहकार कायद्यातील तरतुदीनुसार त्यांची चौकशी करण्यात यावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)