प्रहार जनशक्ती संघटनेचे उपोेषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:38 IST2020-12-04T04:38:36+5:302020-12-04T04:38:36+5:30
नाशिकरोड : कृषी विधेयकाच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर प्रहार ...

प्रहार जनशक्ती संघटनेचे उपोेषण
नाशिकरोड : कृषी विधेयकाच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाने गुरुवारपासून उपोषण सुरू केले. प्रहार जनशक्ती पक्षाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र शासनाने नुकतेच कृषी विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात बहुमताच्या जोरावर मंजूर करून देशभरात कायदा लागू केला आहे. यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक दृष्टीने मोडीत निघणार असून मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या हातात शेतकऱ्यांच्या आर्थिक नाड्या जाणार आहे. बाजार समिती, हमीभाव ही व्यवस्था पूर्णपणे मोडीत निघणार आहे. यासाठी पंजाबमधील शेतकऱ्यांनी आठ दिवसांपासून आंदोलन छेडले आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच केंद्र शासनाने तातडीने दखल घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
प्रहारचे जिल्हाप्रमुख शरद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष शिंदे, कमलाकर शेलार, योगेश शिंदे, प्रमोद सोनकांबळे, कैलास दातीर, राहुल इनामदार, मुकुंद खर्जे , मंगेश खरे, चंद्रकांत डावरे , कपिल कोठुरकर , गोकूळ कासार आदी उपोषणामध्ये सहभागी झाले आहे.
फोटो ओळ
नाशिकरोड विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले प्रहारचे जिल्हाप्रमुख शरद शिंदे , संतोष शिंदे, कमलाकर शेलार, योगेश शिंदे, प्रमोद सोनकांबळे, कैलास दातीर, राहुल इनामदार, मुकुंद खर्जे, मंगेश खरे, चंद्रकांत डावरे, कपिल कोठुरकर, गोकूळ कासार आदी.
(०३प्रहार जनशक्ती आंदोलन)