सुभाषचंद्र बोस जयंती साजरी
By Admin | Updated: January 24, 2016 23:04 IST2016-01-24T23:04:47+5:302016-01-24T23:04:57+5:30
सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

सुभाषचंद्र बोस जयंती साजरी
नाशिक : येथील सागरमल मोदी विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र निकम व नेताजींच्या पोशाखात असलेले अथर्व सचिन निरंतर, विश्वैश्वर बनछोडे या विद्यार्थ्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन केले. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी नेताजींच्या जीवनावर आधारित विविध प्रसंगांचे भाषणातून कथन केले. आरंभ सोनवणे, संजीवनी वाघ, विशाखा शिंदे, प्रांजल पवार, अजय कलबुर्गी, सप्तमी आंबेकर या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी अथर्व निरंतर हा विद्यार्थी नेताजींच्या वेशभूषेत उपस्थित होता. कार्यक्र मास सुरेखा बोकडे , उज्ज्वला कासार, अलका तुपे तसेच पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय कोठावदे, सचिन निरंतर उपस्थित होते. सूत्रसंचालन मृणाल जगदाळे, तर आभार प्रदर्शन तन्मय सोनवणे या विद्यार्थ्यांनी केले.