न्यायडोंगरी-बोलठाणला उपबाजार सुरू

By Admin | Updated: October 21, 2015 23:22 IST2015-10-21T23:22:22+5:302015-10-21T23:22:56+5:30

न्यायडोंगरी-बोलठाणला उपबाजार सुरू

The sub-market of judicial-bolt started | न्यायडोंगरी-बोलठाणला उपबाजार सुरू

न्यायडोंगरी-बोलठाणला उपबाजार सुरू

नाशिक : नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत कित्येक वर्षांपासून बंद असलेले न्यायडोंगरी व बोलठाण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार सुरू करण्यात आल्याची माहिती पंचायत समिती सदस्य शशिकांत मोरे यांनी दिली. लवकरच आणखी दोन उपबाजार कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अनेक वर्षांपासून न्यायडोंगरी व बोलठाण येथील नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गतचे उपबाजार सुरू झाल्याने शेतकऱ्यांची सोय झाली आहे. या दोन्ही उपबाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचे कापूस-मका पिकांसह नगदी पिके विक्रीची सोेय झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे उपाध्यक्ष व नांदगाव शिवसेना तालुका संघटक सुहास कांदे यांच्या हस्ते फीत कापून उपबाजाराचे लिलाव सुरू करण्यात आले. याप्रसंगी नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तेज कवडे, माजी आमदार संजय पवार, शिवसेना तालुकाप्रमुख राजाभाऊ जगताप, शशिकांत मोरे, सरपंच गायत्री मोरे, गोटीराम अहेर, सीताराम राठोड, ऋषीराज सोनार, भरत अजमेरा, सुमती दुगड आदिंसह शेतकरी उपस्थित होते.

Web Title: The sub-market of judicial-bolt started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.