रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून उपनिरीक्षकाची आत्महत्त्या
By Admin | Updated: May 1, 2016 00:18 IST2016-04-30T23:41:15+5:302016-05-01T00:18:23+5:30
रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून उपनिरीक्षकाची आत्महत्त्या

रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून उपनिरीक्षकाची आत्महत्त्या
नाशिक : महाराष्ट्र पोलीस अकादमीत (एमपीए) कर्तव्यावर असलेल्या राज्य राखीव दलातील पोलीस उपनिरीक्षकाने सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेत आत्महत्त्या केल्याची घटना शनिवारी (दि़ ३०) घडली़ या उपनिरीक्षकाचे नाव उत्तम मारुती धनवटे (५७, रा़धुळे, मूळ रा़ मनमाड, ता़जि़नाशिक) असे आहे़ दरम्यान, कौटुंबिक कारणावरून ही आत्महत्त्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे़
महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या संरक्षणाची जबाबदारी एसआरपीएफकडे असून, राज्याच्या विविध ठिकाणचे एसआरपीएफचे अधिकारी व कर्मचारी ३५ दिवसांच्या बंदोबस्तासाठी तैनात केले जातात़ १६ एप्रिल रोजी धुळे येथील एसआरपीएफच्या दोन प्लाटून नाशिक एमपीएमध्ये तैनात करण्यात आल्या होत्या़ त्यामध्ये धुळे एसआरपीएफच्या ग्रुप नंबर ६ मधील कंपनी ‘ए’ मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर उत्तम धनवटे यांचाही समावेश
होता़ (पान ५ वर)
महाराष्ट्र पोलीस अकादमीतील क्युआरटी बॅरेकच्या रुममध्ये शनिवारी (दि़३०) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास धनवटे यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी घालून आत्महत्त्या केली़ बॅरेकमधील गोळीचा आवाज ऐकून कर्मचारी तेथे गेले असता हा प्रकार समोर आला़ या घटनेची माहिती हवालदार रोहित पवार यांनी गंगापूर पोलिसांना कळविली़
गंगापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर काळे यांनी एमपीएमधील घटनास्थळी भेट देऊन आत्महत्त्येसाठी वापरण्यात आलेले सर्व्हिस रिव्हॉल्व्हर, खाली केस व मॅक्झिन ताब्यात घेतले तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात पाठविला़ दरम्यान, धनवटे यांनी कौटुंबिक कारणातून आत्महत्त्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला असून, या घटनेची गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)