शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

उपनिरीक्षक सानप आत्महत्येप्रकरणी शिक्षिककेसह तिच्या पतीवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 17:02 IST

नाशिक : पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे येथे रेल्वेखाली आत्महत्या करणारे पोलीस उपनिरीक्षक साजन सानप यांच्या पत्नीने बलात्काराचा आरोप करणारी महिला शिक्षिका, तिचा पोलीस उपनिरीक्षक पती व त्याची प्रेयसी अशा तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दिली आहे़ या प्रकरणी उपनगर पोलिसांनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़

ठळक मुद्देउपनगर पोलीस ठाणे : उपनिरीक्षक आत्महत्या प्रकरण : बलात्काराचा आरोप

नाशिक : पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे येथे रेल्वेखाली आत्महत्या करणारे पोलीस उपनिरीक्षक साजन सानप यांच्या पत्नीने बलात्काराचा आरोप करणारी महिला शिक्षिका, तिचा पोलीस उपनिरीक्षक पती व त्याची प्रेयसी अशा तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दिली आहे़ या प्रकरणी उपनगर पोलिसांनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़

उपनगर पोलीस ठाण्यात शैला साजन सानप (३०, रा. प्रथमेश पार्क, त्रिवेणी चौक, जेलरोड) यांनी दिलेल्या फियार्दीनुसार त्यांचे पती साजन सखाहारी सानप हे मुंबई शहरातील अंबोली पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते़ पती साजन सानप हे गत साडेतीन वर्षांपासून आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर टाकण्याची धमकी देत मद्यप्राशन करून वेळोवेळी बलात्कार केल्याची फिर्याद या परिसरातील महिला शिक्षिका तथा पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीने सोमवारी (दि़२६) उपनगर पोलीस ठाण्यात दिली़ यावर पोलिसांनी बलात्कार तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याच्या घटनेनंतर पती साजन सानप यांनी  मंगळवारी (दि़२७) सकाळी पुणे येथे रेल्वेखाली आत्महत्या केली़

पती साजन सानप यांच्याविरोधात बलात्काराची फिर्याद देणारी ३५ वर्षीय शिक्षिका व तिचा पोलीस उपनिरीक्षक पती यांनी संगनमत करून १ जानेवारी २०१५ ते २७ नोव्हेंबर २०१८ पर्र्यंत वेळोवेळी घरी येत होते़ तर संशयित शिक्षिका ही साजन सानप यांच्याकडे अनैतिक संबंध ठेवण्याची मागणी करीत होते, मात्र ती पूर्ण न केल्यानेच शिक्षक महिला व तिचा पती हे ब्लॅकमेल करीत होते़ तसेच बलात्कार व अ‍ॅट्रॉसिटीच्या खोट्या गुन्ह्यात दाखल करण्याची धमकी दिली होती़

पोलीस उपनिरीक्षक व त्याची शिक्षक पत्नी यांनी संगनमताने कट रचून पतीच्या अज्ञात प्रेयसीच्या मोबाईलवर असलेले खोटे-नाटे संभाषण मिळवून पती साजन सानप यांच्यावर खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल केला़ यामुळे पती साजन सानप यांची सामाजिक प्रतिमा खराब करून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले़ या गुह्याचा तपास उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस