उपअभियंत्याला लाच घेताना अटक
By Admin | Updated: April 27, 2017 02:12 IST2017-04-27T02:12:50+5:302017-04-27T02:12:59+5:30
मनमाड : येथील वीज वितरण कंपनीचे कार्यकारी उपअभियंता धनंजय खैरनार यांना लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

उपअभियंत्याला लाच घेताना अटक
मनमाड : येथील वीज वितरण कंपनीचे कार्यकारी उपअभियंता धनंजय खैरनार यांना पाच हजाराचंी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.२६) कार्यालयात रंगेहात पकडले.
चांदवड तालुक्यातील शिंगवे येथे लॉन्ससाठी एसटी लाईन कर्मसिअल मीटर, दोन पोल टाकून त्यावर विद्युत तारा बसवून वीजपुरवठा जोडणे या कामाचे अंदाजपत्रक उपविभागीय कार्यालयाकडे पाठविण्यासाठी तक्रारदाराकडे १५ हजाराची मागणी केली होती. त्यावरून संबंधिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, उपधिक्षक सुनिल गागुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. (वार्ताहर)