शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
2
तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला
3
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ
4
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
6
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
7
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
8
GST सह सोन्याचा दर पोहचला १,००,००० प्रति तोळा; ग्राहकांना २० टक्के परतावा
9
रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा
10
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
11
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे
12
२१ वर्ष पूर्ण झालेल्या नव्याने पात्र ठरणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’ना केव्हा मिळणार लाभ?
13
विमानतळावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना नाहक त्रास नको; हायकोर्टाने कंपन्यांना फटकारले
14
कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू
15
प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग
16
क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला
17
चॅटजीपीटीचा वापर करून २ बहिणींनी केली कमाल; वाचवले तब्बल १० हजार डॉलर्स
18
‘पॉवर’ दाखवा, पृथ्वीला मूठभर अब्जाधीशांच्या आर्थिक दादागिरीतून सोडवा!
19
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
20
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत

सुरगाणा तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयाचे काम मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 00:58 IST

सुरगाणा : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांची कुटूंब कल्याण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री निवड झाल्याने कळवण, सुरगाणा तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिल्ली येथे निर्माण भवनात जाऊन डॉ. भारती पवार यांची भेट घेत त्यांचा सन्मान केला. यावेळी सुरगाणा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयाचे काम लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन डॉ. पवार यांनी दिले. याचवेळी त्यांनी सुरगाणा तालुक्यातील आरोग्याच्या समस्यावरही सविस्तर चर्चा केली.

ठळक मुद्देडॉ. भारती पवार : शिष्टमंडळाने घेतली दिल्लीत भेट

सुरगाणा : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांची कुटूंब कल्याण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री निवड झाल्याने कळवण, सुरगाणा तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिल्ली येथे निर्माण भवनात जाऊन डॉ. भारती पवार यांची भेट घेत त्यांचा सन्मान केला. यावेळी सुरगाणा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयाचे काम लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन डॉ. पवार यांनी दिले. याचवेळी त्यांनी सुरगाणा तालुक्यातील आरोग्याच्या समस्यावरही सविस्तर चर्चा केली.यावेळी डॉ. पवार यांनी आदिवासी भागातील कोविड लसीकरण बाबतीत कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांनी जनजागृतीकडे लक्ष केंद्रित करून लसीकरण वाढविण्याकरीता सहकार्य करावे असे आवाहन केले. तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली उपजिल्हा रुग्णालयाची मागणी पदाधिकारी यांनी केली असता, लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

तसेच पदाधिकाऱ्यांकडून उंबरठाण, बोरगाव येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात यावे. बा-हे, उंबरठाण, पांगारणे, खोकरविहीर, श्रीभुवन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात यावी आदी आशयाचे निवेदन देण्यात आले.

शिष्टमंडळात भाजपा ग्रामीण उपजिल्हाध्यक्ष रमेश थोरात, संघटन सरचिटणीस डॉ. अनिल महाजन, सरचिटणीस एस. के. पगार, कार्यकारिणी सदस्य सचिन सोनवणे, कोषाध्यक्ष रामकृष्ण पगार, दीपक खोत, गोरखनाथ महाले, हिरामण चौधरी आदींचा समावेश होता. निवेदनावर युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन महाले, दिनकर पिंगळे, बाळासाहेब सुर्यवंशी, प्रभाकर पवार, सुरेश देशमुख, हेमराज धुम, नारायण महाले, रामदास चौधरी, यमुना वार्डे, सलमान शेख, युवराज चौधरी, हिरामण चौधरी आदींच्या स्वाक्ष-या आहेत.(१४ सुरगाणा १)दिल्ली येथील निर्माण भवनात जाऊन डॉ. भारती पवार यांना निवेदन सादर करतांना रमेश थोरात, डॉ.अनिल महाजन.

टॅग्स :Dr Bharti Pawarडॉ. भारती पवारBJPभाजपा