कोनशिला न बसविण्याच्या निषेधार्थ ठिय्या

By Admin | Updated: August 3, 2014 01:59 IST2014-08-03T01:22:05+5:302014-08-03T01:59:01+5:30

कोनशिला न बसविण्याच्या निषेधार्थ ठिय्या

Stumbling around the denial of not setting the corner | कोनशिला न बसविण्याच्या निषेधार्थ ठिय्या

कोनशिला न बसविण्याच्या निषेधार्थ ठिय्या

 

नाशिकरोड : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभिकरणानंतर जुनी उद्घाटनाची कोनशिला न बसविल्याच्या निषेधार्थ नगरसेवक वैशाली भागवत यांनी सभागृहात ठिय्या आंदोलन केले. यावेळी नगरसेवकांनी विविध प्रश्न व समस्यावरून प्रशासनाला धारेवर धरले होते.
सभापती कोमल मेहेरोलिया यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी प्रभाग सभा झाली. यावेळी नगरसेवक वैशाली भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे सुशोभिकरण होऊन आठ महिने उलटले, मात्र अद्यापही जुनी उद्घाटनाची कोनशिला बसविली नाही. बांधकाम विभाग टाळाटाळ का करते, कोणाचा दबाव आहे हे स्पष्ट सांगावे असे म्हणत भागवत यांनी प्रभाग सभापतिंसमोर ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. यावेळी बांधकाम विभागाचे उपअभियंता नीलेश साळी यांनी नव्याने बनविलेली कोनशिला तयार असून, ती कुठे बसवायची हे ठरलेले नव्हते. मात्र याबाबत काल शुक्रवारी पुतळ्याच्या दर्शनी भिंतीवरील शिवमुद्रेखाली ती जुनी कोनशिला बसविण्याचे नक्की झाल्याचे सांगितले. २४ तासांत कोनशिला बसवावी असे म्हणत भागवत यांनी ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले.
यावेळी बिटको रुग्णालयात पोलीस चौकी उभारून कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, त्या बंदोबस्ताचे मनपाने देय द्यावे असा ठराव करण्यात आला. २४ तासांत कोनशिला बसविण्याच्या आश्वासना नंतर व सर्व नगरसेवकांनी केलेल्या आवाहनानुसार भागवत यांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले.
बैठकीला नगरसेवक शिवाजी सहाणे, सूर्यकांत लवटे, केशव पोरजे, कन्हैया साळवे, हरिष भडांगे, रंजना बोराडे, कमल आढाव, शोभना शिंदे, शोभा आवारे, वैशाली दाणी, विभागीय अधिकारी किशोर चव्हाण व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Stumbling around the denial of not setting the corner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.