शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पावसापासून वह्यापुस्तके वाचविण्यासाठी विद्यार्थ्यांची कसरत ; दफ्तर सांभाळताना धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 19:58 IST

जिल्ह्यासह शहरातही मान्सूनचे आगमन झालेले असतानाच प्लास्टिकबंदीची अंमलबाजवणीही सुरू असल्यामुळे दैनंदिन कामात प्लास्टिकचा वापर करता येत नसल्याने सर्वसामान्य सर्वसामान्य नागरिकांसह रोज शाळेत जाणारे विद्यार्थी आणि महाविद्यालयीन प्रवेशासाठी घराबाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची कागदपत्र व दफ्तर सांभाळताना धांदल उडताना दिसत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांची कागदपत्र व दफ्तर सांभाळताना धांदल अतिमहत्वाचे कागदपत्र भिजून खराब होण्याची भितीप्रवेशासाठी कागदपत्रांसह बाहेर कसे पडावे? विद्यार्थ्यांसमोर प्रश्न

नाशिक : जिल्ह्यासह शहरातही मान्सूनचे आगमन झालेले असतानाच प्लास्टिकबंदीची अंमलबाजवणीही सुरू असल्यामुळे दैनंदिन कामात प्लास्टिकचा वापर करता येत नसल्याने सर्वसामान्य सर्वसामान्य नागरिकांसह रोज शाळेत जाणारे विद्यार्थी आणि महाविद्यालयीन प्रवेशासाठी घराबाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची कागदपत्र व दफ्तर सांभाळताना धांदल उडताना दिसत आहे. सध्या अकरावी प्रवेशासह विविध तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असलेले कागदपत्र सोबत घेऊन सायबर कॅफेसह मार्गदर्शन केंद्र, सुविधा केंद्र, रिपोर्टींग सेंटर आणि शाळा महाविद्यालयांमध्ये फिरावे लागत आहे. त्याचप्रमाणे प्रवेशासाठी आवश्यक असलेले जातीचे दाखले, जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले आदि विविध कागदपत्र जमविण्यासाठी आणि ते प्रवेशप्रक्रीयेत सादर करण्यासाठी पावसात फिरावे लागत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्यासाठी अतिमहत्वाचे असे हे कागदपत्र भिजून खराब होण्याची भिती आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी विद्यार्थ्यांना कागदपत्र अथवा दफ्तरातील वह्या पुस्तकांचे पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या वापर येत नसल्याने पावसात महत्वाचे कागद आणि वह्या पुस्तके कशी जपावीत असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. शहरात प्लास्टिकबंदीची कडेकोट अंमलबजावणी सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यामध्ये प्लास्टिकची पिशवी वापरण्याविषयी भिती आहे.त्यामुळे विद्यार्थी जाड फाईल व बॅगमधून कागदपत्र घेऊन जात असले तरी अधून मधून पावसाचा जोर वाढत असल्याने कागदपत्र वाचविण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या इमारती,रस्त्यांच्या कडेची वृक्ष, बस स्थानके , चहाच्या टपऱ्या व रस्त्यालगतच्या दुकानांच्या आश्रयाला उभे राहावे लागत असल्याने शैक्षणिक प्रवेशासाठी व शाळा महाविद्यालयांमध्ये जाताना पाण्यापासून धोका असलेले कागदपत्र आणि वह्या पुसके सांभाळायच्या कशा असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीNashikनाशिकStudentविद्यार्थीSchoolशाळाcollegeमहाविद्यालय