शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनाचे धान्य वाटप करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 4:35 PM

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत देशासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लॉकडाउन करण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतला आहे. त्यात गर्दी टाळण्यासाठी १६ मार्चपासूनच शाळा, अंगणवाड्या, महाविद्यालयांना सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा निर्णय : शालेय स्तरावर गर्दी टाळण्याच्या सूचनाशालेय विद्यार्थ्यांचे कुपोषण रोखण्यासाठी शालेय स्तरावर शिल्लक असलेला तांदूळ

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांना सुट्या जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना शाळेमध्ये मध्यान्ह भोजनासाठी दिले जाणारा पोषण आहार शाळांच्या पातळीवर पडून असल्याची बाब लक्षात आल्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सदरचे धान्य विद्यार्थ्यांना वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय पातळीवरच याचे वाटप होणार असले तरी, वाटपाच्या वेळी विद्यार्थी व पालकांनी गर्दी टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत देशासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लॉकडाउन करण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतला आहे. त्यात गर्दी टाळण्यासाठी १६ मार्चपासूनच शाळा, अंगणवाड्या, महाविद्यालयांना सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शाळा बंद झाल्याने विद्यार्थी मध्यान्हातील पोषण आहारापासून वंचित राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने देशातील शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याचे आदेश सरकारला दिले असून, शालेय विद्यार्थ्यांचे कुपोषण रोखण्यासाठी शालेय स्तरावर शिल्लक असलेला तांदूळ व कडधान्यसाठा शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील हंगामी वसतिगृह व शाळांमध्ये शिल्लक असलेला धान्य साठा वाटप करण्याचे आदेश नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले आहेत. धान्य वाटप करत असताना शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेची सक्तीने पालन करण्याची खबरदारी शालेय व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व पोषण आहार कामकाज पाहणारे शिक्षकांनी घ्यावी. शालेय स्तरावर धान्य व कडधान्य वाटप करण्याबाबत पूर्व कल्पना पोलीस विभाग व तालुकास्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका पोलिसांना देण्यात येऊन याबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार शालेय व्यवस्थापन समितीस देण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद