शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जाच्या भाग दोन प्रक्रियेची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 5:26 PM

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी रविवारी (दि.०९) सायंकाळपर्यंत सुमारे २८ हजार ६६४ अर्जांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी २० हजार २१४ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जातील भाग एक भरला असून १८ हजार ७४२ विद्यार्थ्यांनी संबंधित मुख्याध्यापकांकडून ऑनलाइन पडताळणीही करून घेतली आहे. या विद्यार्थ्यांना आता ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग दोन भरण्यासाठी प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. 

ठळक मुद्देअकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नाशकात ६० महाविद्यालयांमध्ये २५ हजार २७० जागा सुमारे २८ हजार ६६४ विद्यार्थ्यांची नोंदणी

नाशिक : महानगरपालिका क्षेत्रातील विविध ६० महाविद्यालयांमध्ये उपलब्ध २५ हजार २७० जागांवर अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी रविवारी (दि.०९) सायंकाळपर्यंत सुमारे २८ हजार ६६४ अर्जांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी २० हजार २१४ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जातील भाग एक भरला असून १८ हजार ७४२ विद्यार्थ्यांनी संबंधित मुख्याध्यापकांकडून ऑनलाइन पडताळणीही करून घेतली आहे. या विद्यार्थ्यांना आता ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग दोन भरण्यासाठी प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील ६० कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी उपलब्ध एकूण २५ हजार २७० जागांवर प्रवेशप्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. या प्रक्रियेत ऑनलाइन नोंदणी करून प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या सुमारे २० हजार २१४ विद्यार्थंनी प्रवेश अर्जाचा भाग एक भरून त्यांचे ऑनलाइन अर्ज लॉक के ले आहेत. त्यापैकी १८ हजार ७४२ विद्यार्थ्यांनी त्यांच्या अर्जांची ऑनलाइन पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करून घेतली असून, आता त्यांना अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. ऑनलाइन प्रवेश अर्जाच्या भाग दोनमध्ये विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचा पर्याय निवडावा लागणार आहे. यात विद्यार्थ्यांना शहरातील विविध ६० महाविद्यालयांमध्ये ११ हजार ५५० अनुदानित, ८ हजार १६० विनाअनुदानित, ५ हजार ३२० स्वयंअर्थसाहाय्यच्या जागा उपलब्ध आहेत. यात सर्वाधिक विज्ञान शाखेच्या १० हजार १६०, वाणिज्यच्या ८ हजार ६००, कलाशाखेच्या ४ हजार ९१० व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या (एचएसव्हीसी) १३६० जागांचा समावेश आहे. यातील योग्य पर्याय निवडून विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जाचा भाग दोन भरावा लागणार आहे. परंतु, अद्याप भाग दोनच्या प्रक्रियेविषयी शिक्षण विभागाने कोणतीही सूचना दिलेली नसल्याने विद्यार्थांना भाग दोनची प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान,  ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, अशा विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन नोंदणी करून आॅनलाइन अर्जाचा भाग एक भरता येणार आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी