दिंडोरीरोडला विद्यार्थ्याची आत्महत्या
By Admin | Updated: June 30, 2017 00:11 IST2017-06-30T00:10:44+5:302017-06-30T00:11:16+5:30
पंचवटी : दिंडोरीरोडवरील गायत्रीनगर परिसरात राहणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.२८) रात्री घडली

दिंडोरीरोडला विद्यार्थ्याची आत्महत्या
पंचवटी : दिंडोरीरोडवरील गायत्रीनगर परिसरात राहणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.२८) रात्री घडली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. समाधान अशोक जेजूरकर असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. दिंडोरीरोडवरील गायत्रीनगर येथील साईपार्क येथे जेजूरकर राहात होता. बुधवारी रात्री त्याने घरात गळफास लावून घेतला. सदर घटना कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्याने आत्महत्या का केली याबाबत कोणतेही कारण स्पष्ट झाले नाही. मयत विद्यार्थी हा नुकताच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता, असेही पोलिसांनी सांगितले.