शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
5
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
6
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
7
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
8
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
9
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
10
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
11
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
12
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
13
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
14
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
15
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
16
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
17
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
18
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
19
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
20
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल

विद्यार्थ्यांना सकारात्मकतेसह पोषक वातावरण गरजेचे : तांबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:13 IST

आजच्या पिढीतील विद्यार्थी हे मागील पिढीतील विद्यार्थ्यांपेक्षा स्मार्ट आहेत. त्यांची आकलनक्षमता अधिक आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना सकारात्मकता, पोेषक वातावरण, चुका करण्याची, प्रश्न विचारण्याची मुभा दिली तर ते चांगले शिकतील, व्यक्तिमत्त्व घडवू शकतील, असे प्रतिपादन बाल शिक्षण अभ्यासक राजीव तांबे यांनी केले.

नाशिक : आजच्या पिढीतील विद्यार्थी हे मागील पिढीतील विद्यार्थ्यांपेक्षा स्मार्ट आहेत. त्यांची आकलनक्षमता अधिक आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना सकारात्मकता, पोेषक वातावरण, चुका करण्याची, प्रश्न विचारण्याची मुभा दिली तर ते चांगले शिकतील, व्यक्तिमत्त्व घडवू शकतील, असे प्रतिपादन बाल शिक्षण अभ्यासक राजीव तांबे यांनी केले.रोटरी क्लब आॅफ नाशिकतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. गंजमाळ येथील रोटरी हॉलमध्ये बुधवारी (दि.२६) सायंकाळी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. तांबे पुढे म्हणाले, मुलांना अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण करून दिले पाहिजे. शिकू शकतो असा विश्वास मुलांच्या मनात निर्माण करून दिला पाहिजे. ‘हे करू नका, ते करू नका’ असे न म्हणता त्यांना सकारात्मक पद्धतीने वाढवले पाहिजे.  व्यासपीठावर रोटरी क्लबचे अध्यक्ष राधेय येवले, डॉ. मुग्धा लेले, ओमप्रकाश रावत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार होत्या. यावेळी नामदेव वाजे, संजय पवार, डॉ. दिलीप पवार, संजय येशी, जगदीश डिंगे, शरद गिते, बलराम माचरेकर, भारती पाटील या जिल्हाभरातील शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी सुरेखा राजपूत, उमेश देशमुख, मृदुला बेळे यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिक्षकांच्या पाठीवर थापमुलांना समजून सांगितले तरच ते नको असलेल्या गोष्टी करणार नाहीत व दुष्परिणामांना सामोरे जाण्याची वेळ पालकांवर येणार नाही. त्यांच्या चुकांसह त्यांचा स्वीकार करा, त्यांच्याशी मैत्री करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचा हा प्रयत्न प्रेरणादायी असल्याचे पवार यांनी नमूद केले.

टॅग्स :Rotary Clubरोटरी क्लबEducation Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षक