शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील विद्यार्थ्यांचीही फी माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 01:23 IST

नाशिक तालुकाही शासनाने दुष्काळी जाहीर केल्यामुळे साहजिकच नाशिक शहरातही शासनाने घोेषित केलेल्या सवलती लागू होणार असून, विद्यार्थ्यांना मोफत बस पास सवलतीबरोबरच त्यांचे शैक्षणिक शुल्कही माफ केले जाणार आहे.

नाशिक : नाशिक तालुकाही शासनाने दुष्काळी जाहीर केल्यामुळे साहजिकच नाशिक शहरातही शासनाने घोेषित केलेल्या सवलती लागू होणार असून, विद्यार्थ्यांना मोफत बस पास सवलतीबरोबरच त्यांचे शैक्षणिक शुल्कही माफ केले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी शुल्क भरले असल्यास ते शिक्षण संस्थांनी परत करावे अन्यथा कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी दिला आहे.  जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबतचा अहवाल सोमवारी राज्य सरकारला सादर करण्यात आला. त्यात सरकारने दुष्काळी परिस्थितीसाठी ठरवून दिलेल्या निकषानुसार काय काय कार्यवाही करण्यात आली, तसेच प्रत्येक तालुक्यातील पीक परिस्थितीचाही त्यात उल्लेख करण्यात आला. किती शेतकरी दोन हेक्टरी आहेत व किती त्यापेक्षा कमी याची सविस्तर माहिती त्यात समाविष्ट करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील त्याला दुजोरा दिला असून, शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांकडून शुल्क घेऊ नये, घेतले असल्यास ते परत करावे अन्यथा कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याचे पाणी व जनावरांना चारा देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.  सरकारने दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी ज्या काही उपाययोजना लागू केल्या त्या साºया उपाययोजना नाशिक शहरासही लागू असून, विशेष करून शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शासनाच्या फी सवलतीचा लाभ मिळणार आहे.

टॅग्स :droughtदुष्काळSchoolशाळाStudentविद्यार्थी