शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

स्थानिक भाषा येण्यात विद्यार्थ्यांचे हितच अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:42 IST

प्रत्येक शाळेत मराठी भाषा शिकवणे बंधनकारक करण्याच्या शासनाच्या प्रस्तावित निर्णयाबाबत बहुतांश शालेय प्रमुखांनी सकारात्मकता दाखविली आहे. विद्यार्थी अन्य भाषिक असला तरी त्याला स्थानिक मराठी भाषा येणे, हे बंधनकारक न मानता त्यातील उपयुक्तता समजून घ्यावी.

माझे मतनाशिक : प्रत्येक शाळेत मराठी भाषा शिकवणे बंधनकारक करण्याच्या शासनाच्या प्रस्तावित निर्णयाबाबत बहुतांश शालेय प्रमुखांनी सकारात्मकता दाखविली आहे. विद्यार्थी अन्य भाषिक असला तरी त्याला स्थानिक मराठी भाषा येणे, हे बंधनकारक न मानता त्यातील उपयुक्तता समजून घ्यावी. कारण त्यात विद्यार्थ्यांचे अधिक प्रमाणात हित असल्याचा सूर नाशिक महानगरातील विविध शाळांच्या प्रमुखांनी व्यक्त केला.शाळांमध्ये मराठीची सक्ती हा प्रस्तावित निर्णय अत्यंत आवश्यक होता. अन्य अनेक राज्यांमध्ये तेथील भाषा शिकणे बंधनकारक असल्याने महाराष्ट्रातदेखील तो निर्णय होणे अपेक्षितच होते. शासनाने योग्य दिशेने टाकलेले हे पाऊल आहे. मात्र, महाराष्टÑातील मराठी माणसांनी व्यवहारातदेखील मराठी भाषेचा वापर केला तरच मराठी टिकू शकेल. त्यामुळे मराठी भाषेचा व्यावहारिक उपयोग अधिकाधिक कसा करता येईल, त्याचादेखील गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.- प्रा. दिलीप फडके, शिक्षणतज्ज्ञप्रत्येक शाळेमध्ये मराठी भाषाबंधनकारक करायलाच हवी, असे माझेदेखील मत आहे. आपण अन्य देशांच्या भाषा शिकू शकतो, तर जिथे राहतो तेथील भाषा शिकण्यास कोणतीच अडचण नसावी. स्थानिक भाषा शिकणे हा त्या भाषेचा सन्मान असतो, तसेच मुलांची त्या भाषेशी आणि स्थानिकांशी भावनिक जवळीकदेखील वाढण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक शाळेत मराठी भाषेचा आवर्जून समावेश करायला हवा, असे मला वाटते.- रतन लथ, संचालक, फ्रावशी अकॅडमीप्रत्येक राज्यात तेथील भाषासक्ती ही करायलाच हवी, असे माझे मत आहे. एसएससी बोर्डप्रमाणेच सीबीएसई, आयसीएसईलादेखील मराठी बंधनकारक करण्याच्या निर्णयाचे स्वागतच व्हायला हवे. महाराष्टÑात राहताना मराठी येण्याने त्या मुलांचाच फायदा होणार असतो. त्यामुळे इतर भाषिक असले तरी ते समाजात सहजतेने मिसळू शकतात.- विजयालक्ष्मी मणेरीकर, संचालक,ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूलकोणत्याही भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांसाठी स्थानिक भाषांचे महत्त्व खूप असते. त्यामुळे त्याची सक्ती वाटून न घेता, ती संधी मानत शिकायला हवी. जी मुले अधिकाधिक भाषा शिकतात, त्यांचे ज्ञान अधिकाधिक समृद्ध होत जाते. त्यासाठी गत शतकात विदेशात गेलेल्या भारतीयांची उदाहरणेदेखील नजरेसमोर ठेवता येतील. तसेच बालवयात मुलांना भाषेचे आकलन अधिक झटकन होत असल्याने बालपणापासून माध्यमिक शाळेपर्यंत मराठी भाषा बंधनकारक केली तरी त्याचे स्वागतच होईल.- स्वामिनी वाघ, मुख्याध्यापक, बॉइज टाउन स्कूल

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा