समाजकल्याण विभागाची परीक्षा देऊन केंद्राबाहेर पडताना विद्यार्थी-विद्यार्थिनी.

By Admin | Updated: July 14, 2014 00:31 IST2014-07-14T00:17:09+5:302014-07-14T00:31:33+5:30

समाजकल्याण विभागाची परीक्षा देऊन केंद्राबाहेर पडताना विद्यार्थी-विद्यार्थिनी.

The students and students of the Social Welfare Department are out of the center. | समाजकल्याण विभागाची परीक्षा देऊन केंद्राबाहेर पडताना विद्यार्थी-विद्यार्थिनी.

समाजकल्याण विभागाची परीक्षा देऊन केंद्राबाहेर पडताना विद्यार्थी-विद्यार्थिनी.

‘समाजकल्याण’साठी पाच हजार परीक्षार्थीनाशिक : समाजकल्याण विभागाच्या विविध विभागांच्या सहा पदांसाठी शहरातील २२ परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली. विभागातील सुमारे ५३६२ उमेदवारांनी समाजकल्याण विभागाची परीक्षा दिली.
समाजकल्याण आयुक्तालयाच्या वतीने सदर परीक्षा घेण्यात आली. वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक, गृहपाल, समाजकल्याण निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, निम्न श्रेणी व उच्च श्रेणी लघुलेखक या सहा पदांसाठी शहरातील २२ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली.
विभागीय पातळीवर घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी नाशिक विभागातून ८६७६ इतक्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ५३६२ उमेदवारांनीच परीक्षा दिली. दोन सत्रात सदर परीक्षा घेण्यात आली. सकाळी ११ ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक, गृहपाल, समाजकल्याण निरीक्षक, वरिष्ठ लिपिक या पदांसाठी २१ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. परीक्षेला एकूण ८५४० पैकी ५२६२ परीक्षार्थी होते, अशी माहिती प्रादेशिक उपआयुक्त समाजकल्याण विभाग के.एन. गवळे यांनी दिली.
या परीक्षेसाठी १० क्षेत्रीय अधिकारी, ५७५ कर्मचाऱ्यांची केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक व समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २२ केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांचीदेखील नियुक्ती करण्यात आली होती. या केंद्रांवर २२ व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले. सहमुख्य परीक्षा नियंत्रक राजेंद्र कलाल व परीक्षा नियंत्रक हेमंत जाधव यांच्या देखरेखीखाली सदर परीक्षा पार पडल्या.(प्रतिनिधी)

Web Title: The students and students of the Social Welfare Department are out of the center.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.