शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचा शिक्षणाचे खासगीकरण करण्याचा घाट असल्याचा छात्रभारतीचा आरोप, शिक्षण विभागाच्या परिपत्रकाची होळी करून नोंदवला शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 16:36 IST

नाशिक : शिक्षणात महाराष्ट्र प्रगत झाल्याचा दावा करणाऱ्या राज्य सरकारने, कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावत असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे राज्यातील तब्बल 1314 शाळा बंद करण्यात येणार आहे. अशाप्रकारे शासकीय शाळा बंद करून शिक्षणाचे संपूर्ण खासगीकरण करण्याचा घाट सरकारने घातला असल्याचा आरोप करीत नाशिक जिल्हा छात्रभारती विद्यार्थी संघटनेने ...

ठळक मुद्देपटसंख्या खालावत असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय छात्रभारतीचे आक्रमक भूमिका घेत आंदोलन सरकारच्या परिपत्रकाची होळी करून नोंदवला निषेध

नाशिक : शिक्षणात महाराष्ट्र प्रगत झाल्याचा दावा करणाऱ्या राज्य सरकारने, कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावत असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे राज्यातील तब्बल 1314 शाळा बंद करण्यात येणार आहे. अशाप्रकारे शासकीय शाळा बंद करून शिक्षणाचे संपूर्ण खासगीकरण करण्याचा घाट सरकारने घातला असल्याचा आरोप करीत नाशिक जिल्हा छात्रभारती विद्यार्थी संघटनेने सोमवारी (दि.4) सीबीएस जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शासनाच्या अध्यादेशाची होळी करून सरकारचा निषेध नोंदवला आहे.शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना नजीकच्या अन्य सरकारी वा खासगी शाळेत सामावून घेण्याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले असून, राज्य सरकारचा हा निर्णय शिक्षण हक्क कायद्याचा थेट भंग करणारा असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे. खासगी शाळांमधील दहा हजार विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदांच्या शाळेत प्रवेश घेतल्याचे सांगणाऱ्या शिक्षण विभागाने जिल्हा परिषद व अनुदानित शाळांमधील पटसंख्या खालावल्याचे आणि गुणवत्ता कमी झाल्याचे कारण पुढे करत शाळा बंद करण्याच्या घेतलेल्या या निर्णयाने शिक्षण क्षेत्रत खळबळ उडाली आहे. त्यामुळे छात्रभारतीने आक्रमक भूमिका घेत सोमवारी आंदोलन केले. तसेच शिक्षण विभागाने घेतलेल्या पेपर फुटण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी परीक्षेच्या निश्चित वेळेनंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्याच्या निर्णयाचाही निषेध करण्यात आला. विविध शालेय व बोर्डाच्या परीक्षांसह स्पर्धा परीक्षांसाठी दुर्गम व ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी येतात. त्यांना प्रवासाची साधने उपलब्ध नसल्याने अनेकदा उशीर होतो. त्याचप्रमाणो शहरातील विद्यार्थ्यांनाही अनेकदा वाहतूक कोंडीमुळे तसेच विविध कारणांनी परीक्षेला वेळेत पोहचता येत नाही. मात्र शासनाच्या अशा निर्णयामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानीबरोबरच मानसिक त्रसाचाही सामना करावा लागणार असल्याचे सांगत छात्रभारतीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर गरीब व सर्वसामान्यांच्या विरोधातील शैक्षणिक धोरण राबविण्याचा आरोप केला असून, सरकारने राज्यातील 1314 शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा तसेच परीक्षांसदर्भात घेतलेला निर्णयाचाही पुनर्विचार करावा, अशी मागणी केली आहे. या आंदोलनात छात्रभारतीचे माजी अध्यक्ष समाधान बागुल, राम सूर्यवंशी, शहराध्यक्ष राकेश पवार, जिल्हाध्यक्ष सागर निकम, विशाल रनमाळे, आम्रपाली वाकळे, देवीदास, कोमल गांगुर्डे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

 

टॅग्स :Nashikनाशिकagitationआंदोलन